Mangal Nakshatra Parivartan 2025 : ज्योतिष शास्त्रात मंगळ ग्रहाच्या नक्षत्र परिवर्तनाला (Mangal Nakshatra Parivartan) फार महत्त्वाचं स्थान देण्यात आलं आहे. आज म्हणजेच 19 नोव्हेंबर 2025 रोजी मंगळ ग्रह ज्येष्ठा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. त्यानुसार, आज संध्याकाळी 7 वाजून 40 मिनिटांनी मंगळाचं हे नक्षत्र परिवर्तन होणार आहे. वैदिक शास्त्रानुसार, ज्येष्ठा नक्षत्राचा स्वामी ग्रह बुध आहे. असं म्हणतात की, जेव्हा मंगळ ग्रह नक्षत्र परिवर्तन करतात तेव्हा त्याचा थेट परिणाम मन, करिअर आणि नात्यांवर दिसून येतो.
ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळ ग्रह जिथेही जातो तिथे ऊर्जा, वेग आणि संघर्षसारख्या प्रवृत्ती निर्माण करतो. मात्र, मंगळाच्या नक्षत्र परिवर्तनाने काही राशींना या काळात कठीण परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे. या काळात तुमच्यावर अनेक जबाबदाऱ्याही सोपवण्यात येऊ शकतात. त्यामुळेच या काळात काही राशींना सावधानतेचा इशारा देण्यात येतो. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मंगळाचं नक्षत्र परिवर्तन मेष राशींच्या जीवनात नकारात्मक ऊर्जा निर्माण करणार आहे. या काळात तुम्ही कोणताही मोठा निर्णय घेऊ नये. तसेच, नात्यात छोट्या मोठ्या कारणावरुन वादग्रस्त परिस्थिती निर्माण होऊ शकते. वाहन चालवताना काळजी घ्या. कारण मंगळ ग्रहाच्या प्रभावाने निष्काळजीपणा वाढू शकतो. कामात गडबड केल्यास त्याचं तुम्हाला नुकसानही होऊ शकतं.
कर्क रास (Cancer Horoscope)
मंगळ ग्रहाचं नक्षत्र परिवर्तन कर्क राशीच्या लोकांसाठी फार अशुभ मानलं जाणार आहे. या काळात तुमच्या मनावर फार भार येऊ शकतो. जवळची व्यक्ती तुम्हाला धोका देऊ शकते. त्यामुळे या काळात तुम्हाला भावनांवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. तसेच, घरात काही कारणावरुन तणावग्रस्त परिस्थिती निर्माण होईल. तुमचं मोठं आर्थिक नुकसान या काळात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पैशांचा देखील जपून वापर करा.
कन्या रास (Virgo Horoscope)
मंगळ ग्रहाच्या नक्षत्र परिवर्तनाने तुमच्या करिअरवर, वैवाहिक जीवनावर परिणाम निर्माण होऊ शकतो. जवळच्या व्यक्तीच्या वागण्यामुळे तुम्ही जास्त दुखावले जाऊ शकता. तसेच, व्यवसायात पार्टनरशिप असल्यामुळे तुमच्या सहकाऱ्याबरोबर तुमचे वैचारिक मतभेद होऊ शकतात. त्यामुळे शब्दांचा वापर करताना जपून करा. कोणतीही आर्थिक जोखीम घेऊ नका.
धनु रास (Saggitarius Horoscope)
मंगळ ग्रहाच्या नक्षत्र परिवर्तनाने धनु राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी दबाव निर्माण होऊ शकतो. वरिष्ठांशी बातचीत करताना वाणीवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. तसेच, तुम्ही जी मेहनत घ्याल त्याचं फळ तुम्हाला मिळेल पण कमी प्रमाणात मिळेल. आरोग्याच्या बाबतीत सतर्क राहण्याची गरज आहे. विनाकारण चिडचिड करु नका.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)