Sunny Deol  interview : बॉलिवूड अभिनेता सनी देओल (Sunny Deol) आणि अमीषा पटेल  (Ameesha Patel) यांचा 'गदर 2' (Gadar 2) हा सिनेमा सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे. लवकरच हा सिनेमा 500 कोटींचा टप्पा पार करेल. सिनेमागृहात धुमाकूळ घालणारा हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. प्रेक्षकांनी या सिनेमाला चांगलेच डोक्यावर उचलून धरले आहे. आता हा सिनेमा ऑस्करच्या (Oscar) शर्यतीत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. 


सनी देओलने नुकतेच एक वक्तव्य केले आहे. त्यानं आता स्वताच्या आय क्यु (IQ) बाबत विधान केले आहे. सनीनं रणवीर अलाहबादिया नावाच्या युट्युबरला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये ते विधान केलं आहे. त्यात तो म्हणतो की, शाळेत असताना माझा IQ हा 160 होता. तो खूपच जास्त होता. शाळेत जेव्हा आम्हा सगळ्या विद्यार्थ्यांचा बुद्ध्यांक तपासण्यात आला तेव्हा तो 160 च्या जवळपास होता. असे सनीनं सांगितले. त्यानंतर मात्र सोशल मीडियावर सनीवर नेटकऱ्यांनी टीका केली आहे. नेटकरी म्हणत आहेत, म्हणजे सनी देओलचा IQ हा 160 पेक्षा जास्त असेल तर त्यानं महान शास्त्रज्ञ आईन्स्टाईन यांच्या बुद्धयांकाशी बरोबरी केली आहे.






'गदर 2' हा चित्रपट 2001 मध्ये  रिलीज झालेल्या 'गदर एक प्रेम कथा' या चित्रपटाचा सिक्वेल आहे. 'गदर एक प्रेम कथा' या चित्रपटाला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. गदर 2 चित्रपटामध्ये सनी देओलने तारा सिंहची भूमिका साकारली तर अमिषा पटेलने सकिनाची भूमिका साकारली. 'गदर 2'  या चित्रपटात तारा सिंह, त्याचा मुलगा आणि सकिना यांची कथा दाखवण्यात आली आहे.


सनी आणि अमिषासोबतच 'गदर 2' या चित्रपटामध्ये  लव्ह सिन्हा, सिमरित कौर आणि उत्कर्ष शर्मा  या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे.  अनेक सेलिब्रिटींनी तसेच नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. 


आता 'गदर 2' या चित्रपटानंतर सनी देओल  'माँ तुझे सलाम 2'  या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, असं म्हटलं जात आहे. या सिनेमात सनी देओल (Sunny Deol), तब्बू (Tabu), अरबाज खान (Arbaaz Khan) आणि टिन्नू वर्मा (Teenu Verma) हे कलाकार देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. 


 


इतर महत्वाच्या बातम्या


Tiger 3 First Poster Out : टायगर जिंदा है...'टायगर 3'चं पहिलं पोस्टर आऊट! सलमान-कतरिनाच्या लूकने वेधलं लक्ष