Sunita Ahuja On Govinda Affair: गेल्या कित्येक दिवसांपासून बॉलिवूड (Bollywood News) अभिनेता गोविंदा (Govinda) आणि पत्नी सुनीता अहुजा (Sunita Ahuja) यांच्या घटस्फोटाच्या (Govinda ) चर्चा रंगल्यात. जेव्हा-जेव्हा घटस्फोटाच्या चर्चा रंगतात, तेव्हा-तेव्हा हे जोडपं एकत्र येऊन त्या सर्व चर्चांना पूर्णविराम देतं. पण, तरिसुद्धा काही दिवसांनी पुन्हा दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण येतं. बॉलिवूड अभिनेता गोविंदाचं एका सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीसोबत सुरू असलेलं अफेअर दोघांच्या घटस्फोटासाठी कारण असल्याचंही बोललं जातंय. अशातच आता या चर्चांवर अलिकडेच एका मुलाखतीत बोलताना गोविंदाची पत्नी सुनीता अहुजानं दोघांच्या वेगळं होण्याचं खरं कारण सांगितलं. पारस छाब्राच्या 'आब्रा का डाबरा शो'मधील पॉडकास्टमध्ये बोलताना सुनीता अहुजानं सर्व महिलांना स्वतःसाठी उत्पन्नाचा काहीतरी सोर्स ठेवा आणि पूर्णपणे आपल्या पतीवर अवलंबून राहू नका, असा सल्ला दिला.
गोविंदाच्या अफेअरवर काय म्हणाली सुनीता अहुजा?
एका मराठी अभिनेत्रीसोबत गोविंदाचं अफेअर असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्याबाबत बोलताना सुनीता अहुजा म्हणाली की, "स्वतः पैसे कमवल्यानं एक वेगळाच आनंद मिळतो. तुमचा नवरा तुम्हाला पैसे देतो, पण दहा वेळा मागितल्यानंतरच... तुमची स्वतःची कमाई तुमची आहे..." पुढे बोलताना ती म्हणाली की, तिला गोविंदाकडे मोठं घर मागायचं आहे. तिनं स्पष्ट केलं की, ती तिची मुलगी टीना आणि मुलगा यशसोबत चार बेडरूमच्या घरात राहत होती. गोविंदा तिच्यासोबत राहत नाही... हे घर आमच्यासाठी लहान आहे... या पॉडकास्टद्वारे मी म्हणू इच्छिते, "चिची, मला मोठा हॉल असलेलं पाच बेडरूमचं घर विकत घे, नाहीतर बघ तुझं काय होतं ते..."
गोविंदासोबतच्या तिच्या अडचणीत आलेल्या वैवाहिक जीवनाबद्दल आणि अभिनेत्याच्या अफेअरबद्दल विचारलं असता, तिनं उत्तर दिलं की, "मी मीडियाला अनेक वेळा सांगितलंय की, मी देखील हेच ऐकलंय... पण जोपर्यंत मी ते स्वतःच्या डोळ्यांनी पाहत नाही किंवा त्याला रंगेहाथ पकडत नाही, तोपर्यंत मी काहीही जाहीर करू शकत नाही... मी ऐकलंय की, ती एक मराठी अभिनेत्री आहे..."
"आता हे सगळं करण्याचं वय नाही..."
सुनीता अहुजा म्हणाली की, "आता हे सगळं करण्याचं वय उरलेलं नाही... गोविंदाला आपली मुलगी आणि मुलगा यशच्या करियरबाबत विचार करायला हवा... पण, मीसुद्धा अफवा ऐकल्यात आणि सांगितलंय की, जोपर्यंत मी बोलत नाही, तोपर्यंत कोणत्याही गोष्टींवर विश्वास ठेवू नका... मी मीडियाला सांगितलंय की, मी नेहमीच खरं सांगेल कारण मी खोटं बोलत नाही..."
दरम्यान, गोविंदा आणि सुनीता आहुजा 1987 मध्ये लग्नाच्या बेडीत अडकले. या जोडप्यानं सुरुवातीच्या काही वर्षांपर्यंत लग्न सीक्रेट ठेवलं. त्यानंतर 1989 मध्ये त्यांची मुलगी टीना आहुजाचा जन्म झाल्यानंतर सर्वांना दोघांच्या लग्नाबाबत कळालं. या जोडप्याला दोन मुलं आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :