Kartik Purnima 2025: दिवाळी (Diwali 2025) झाली, तुळशी विवाहला आरंभ झाला, आता देव दिवाळी (Dev Diwali 2025) कधी? अशी उत्सुकता अनेकांना आहे. देवांची दिवाळी, देव दीपावली, कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेच्या दिवशी साजरी केली जाते. हिंदू दिनदर्शिकेनुसार, यंदा कार्तिक पौर्णिमा (Kartik Purnima 2025) 5 नोव्हेंबर 2025 रोजी साजरी केली जाईल. ज्योतिषशास्त्रानुसार पाहायला गेलं तर, कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी अनेक शुभ योग तयार होत आहेत. हे शुभ योग अनेक राशींच्या जीवनावर परिणाम करतील

कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी जबरदस्त शुभ योग बनतायत ( Rare Shubh Yoga formed on Kartik Purnima)

ज्योतिषशास्त्रानुसार, कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू (Lord Vishnu) आणि देवी लक्ष्मीची (Goddess Lakshmi) पूजा महत्त्वाची आहे. यावेळी, शिववास योग आणि सर्वार्थ सिद्धी योग देव दीपावलीच्या दिवशी तयार होत आहेत. या शुभ योगांमुळे तीन राशींना फायदा होईल. या राशींबद्दल जाणून घेऊया.

वृषभ (Taurus)

ज्योतिषशास्त्रानुसार, कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला होणारे हे शुभ योग कन्या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरतील. तुम्हाला देवी लक्ष्मीकडून विशेष आशीर्वाद आणि आर्थिक लाभ मिळेल. तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते. तुमचे उत्पन्न वाढेल.

मिथुन (Gemini)

ज्योतिषशास्त्रानुसार, कार्तिक महिन्यातील पौर्णिमा तुमच्यासाठी भाग्यवान राहील. मिथुन राशीच्या लोकांना अनेक क्षेत्रात सकारात्मक परिणाम जाणवतील आणि आर्थिक काळ चांगला राहील. त्यांना देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे आशीर्वाद मिळतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. तुमचे प्रलंबित काम पूर्ण होईल.

कन्या (Virgo)

ज्योतिषशास्त्रानुसार, कन्या राशीचे लोक भाग्यवान असतील. कार्तिक पौर्णिमेला निर्माण होणाऱ्या या शुभ योगांचा तुम्हाला फायदा होईल. नफा वाढेल आणि नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळेल. तुमचे जुने आणि प्रलंबित काम पूर्ण होईल.

हेही वाचा>>

Shani Transit 2026: 2026 वर्षाची सुरूवातच शनिच्या भव्य संक्रमणानं! मिथुनसह 'या' 3 राशींचे दिवस पालटलेच म्हणून समजा, हातात खेळेल पैसा

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)