Bigg Boss Marathi 3 Task : बिग बॉसच्या घरात सुरू आजी सदस्यांना वेगवेगळे टास्क देत आहे. त्यातच कालपासून घरामध्ये 'चल रे भोपळ्या टुणूक टुणूक' हा कॅप्टनसी टास्क रंगत आहे. या टास्कमध्ये एका टीममधील सदस्य घरी परत जाणाऱ्या म्हातारी होत्या. तर दुसऱ्या टीममधील सदस्य त्यांना थांबवणारे प्राणी होते. प्राणी बनलेल्या सदस्यांना भोपळे घरातील गार्डन परिसरात लपवून ठेवायचे होते. तर म्हातारी बनलेल्या टीममधील सदस्यांना ते भोपळे शोधायचे होते. या प्रक्रियेत बाद न झालेला उमेदवार कॅप्टन पदाचा उमेदवार ठरणार आहे. टीम A मध्ये जय, उत्कर्ष, गायत्री, स्नेहा, संतोष आणि  विकास हे सदस्य आहेत. तर टीम B मध्ये विशाल, आदिश, सोनाली, मीरा, आविष्कार आणि मीनल हे सदस्य आहेत. कालच्या भागात B टीममधून मीरा कॅप्टन पदाची पहिली उमेदवार ठरी आहे. 


आजींनी टास्क सुरू होण्याआधीच सदस्यांना सांगितले होते, जो स्पर्धक जिंकेल त्याला खाऊ मिळेल तर जो हरेल त्याला शिक्षा मिळेल. त्यानुसार कॅप्टन पदाच्या उमेदवारीसाठी जिंकणाऱ्यांना आजी बेसनचे लाडू देणार आहे. हा टास्क चातुर्य आणि चपळाईने करायचा होता. पण ज्या सदस्यांना ते जमले नाही त्या उमेदवारांना चपळाई वाढावी म्हणून 25 उठाबशा काढायला आजींनी सांगितल्या. 


काल मीराला कॅप्टन होण्यासाठी जय आणि उत्कर्षने मदत केली होती. जय आणि उत्कर्ष हे मीराच्या टीममध्ये नसले तरी मीराला मदत करत असल्याने मीनल, आदिशला प्रचंड राग आला होता. तर सोनाली गेम नीट खेळली नाही म्हणून विशालदेखील तिला ओरडत होता. "शब्दाला शब्द वाढत जातो आणि वादाचे रुपांतर वेगळ्या रुपात होते." असंच काहीसं आज आदिश आणि सोनालीच्या बाबतीत होणार आहे. काल सोनालीने भात वाफवण्यावरुन तृप्ती देसाईंसोबत वाद घातला होता. तर आज पोळी बनवण्यावरुन आदिशसोबत वाद घालताना दिसून येणार आहे. बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वात स्वयंपाक बनवताना, जेवताना जास्त भांडणं होत आहेत.   


आज टीम A म्हातारी बनणार असून टीम B मधील सदस्य प्राणी बनणार आहेत. टीम B मधील सदस्यांना भोपळे लपवायचे आहेत. विकास टीम A मध्ये असल्याने तो टीम B सोबत कार्याची रणनिती आखताना दिसून येणार आहे. विकासचे म्हणणे आहे की, "काल जे करत होते तितकं काहीच आपल्याला करायचं नाही. वेगवेगळ्या योजना आखताना टीम B मधील सदस्य दिसून येणार आहेत. त्यामुळे टीम B मधील कोणता सदस्य कॅप्टन पदाचा पहिला उमेदवार ठरणार हे आजच्या भागात कळणार आहे. तर बिग बॉसच्या घरात जास्त भांडणे न करता स्पर्धक कॅप्टनसीचा टास्क खेळतील आणि घरात नवा कॅप्टन नांदेल", अशी आशा व्यक्त केली जात आहे. 


बिग बॉसच्या घरात झाली नव्या सदस्याची एन्ट्री


बिग बॉसच्या घरातून सुरेखा कुडची बाहेर पडल्यानंतर घरात एका नव्या सदस्याची एन्ट्री झाली आहे. हा सदस्य म्हणजे सर्वांच्याच आवडीची 'आजी'. आजीने घरात जादूचा दिवा ठेऊन जादू खरी करुन दाखवली. त्यामुळे सदस्यांना एका सदस्याला वाचविण्याची सुर्वणसंधी मिळाली होती. घरात 'इच्छा माझी पुरी करा' हा नॉमिनेशनचा टास्क पार पडला. घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेपासून या आठवड्यात संतोष चौधरी (दादूस), विकास पाटील, आदिश वैद्य, मीनल शाह नॉमिनेट झाले आहेत.