Subodh Bhave : अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) हा मलिका, नाटक आणि सिनेमा अशा तिन्ही माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सुबोधच्या अनेक भूमिका आजही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात. सुबोध जितका त्याच्या भूमिकांमुळे चर्चेत असतो तितकाच तो त्याच्या वक्तव्यांमुळेही चर्चेत असतो. अनेक मुद्द्यांवर सुबोध अगदी स्पष्टपणे भाष्य करतो. त्याची बाजू परखडपणे मांडत असल्याचं पाहायला मिळतं. मराठी सिनेमांना सिनेमागृहात मिळणारा प्रतिसाद यावरही सुबोधने अनेकदा भाष्य केलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सुबोधनेही ही खंत पुन्हा व्यक्त केली आहे. 


मराठी सिनेमांना प्रेक्षक नाही आणि प्रेक्षकांना मराठी सिनेमा नाही अशी तक्रार वजा खंत कलाकार आणि प्रेक्षक नेहमीच व्यक्त करत असतात. यावर अनेकदा कलाकार तीव्र नाराजीही व्यक्त करतात. तर सिनेमांच्या आशयांवर प्रेक्षक टीका करतात. याच दरम्यान सुबोधने यावर भाष्य करत म्हटलं की, मराठी सिनेमाला कधी कधी 'राजमान्यता' मिळते, पण त्याला 'लोकमान्यता' नाही. सुबोधच्या या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.                            


'...आमची अवस्था फार बरी नाहीये'


लिव लाईक अ योगी देवयानी या पोडकास्टमध्ये सुबोधने मुलाखत दिली. मराठी सिनेमाचं कसं सुरु आहे? यावर बोलताना सुबोधने म्हटलं की, 'मला असं वाटतं की, सिनेसृष्टीत आम्ही सगळे स्वत:ची वाट शोधतोय. पण व्यावसायिकदृष्ट्या आमची अवस्था फार बरी नाहीये. आशा आहे की ती कधीतरी बरी होईल. कधीतरी मराठी सिनेमात काम केलेल्यांचा सन्मान केला जाईल. गरजेचं नाही मग की फक्त कलाकाराचा सन्मान होईल, मराठी सिनेमाशी निगडीत प्रत्येक घटकाचा सन्मान केला जाईल.'


मराठी सिनेमांना राज्यमान्यता, पण लोकमान्यता नाही - सुबोध भावे


पुढे त्याने म्हटलं की,  लोकमान्य टिळकांना लोकमान्य का म्हटलं गेलं... कारण ते लोकांमधून पुढे आलेलं नेतृत्व होतं, लोकांना मान्य असलेलं नेतृत्व होतं. मराठी चित्रपट लोकमान्य नाहीये, मराठी चित्रपट कधी कधी राजमान्य असेल.. त्याला पुरस्कार मिळतात म्हणून किंवा सरकारकडून कधी कधी निधी मिळतात म्हणून, त्याला राजमान्यता मिळाली असेल पण त्याला लोकमान्यता नाहीये. ती लोकमान्यता नसायलाही अनेक कारणं आहेत. 


ही बातमी वाचा : 


Ankita Walavalkar: 'बिगबॉस' फेम सूरजचं वागणं झालं असह्य, अंकिता वालावलकर म्हणाली 'माझ्याकडून आता अपेक्षा नसाव्यात..