Nashibwan Serial Last Episode: स्टार प्रवाहवरील 'नशीबवान' (Nashibwan) ही मालिका अभिनेता आदिनाथ कोठारेमुळे (Adinath kothare) चर्चेत आली होती. या मालिकेत तगड्या कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली. दरम्यान, या मालिकेविषयी (Star Pravah) एक मोठी अपडेट समोर येत आहे. ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. अलिकडेच स्टार प्रवाह वाहिनीने 'नशीबवान' मालिकेचा (Entertainment) अंतिम भागाचा प्रोमो सोशल मीडियात शेअर केला आहे. 25 एप्रिल रोजी या मालिकेचा शेवटचा भाग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अवघ्या 7 महिन्यांत या मालिकेने निरोप घेतल्यामुळे प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सध्या 'नशीबवान' या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
अवघ्या 7 महिन्यांत 'नशीबवान' घेणार प्रेक्षकांचा निरोप, कारण काय? (Adinath Kothare Nashibwan show Ending)
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'नशीबवान' या मालिकेने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं होतं. ही मालिका सप्टेंबर 2025 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. ही मालिका आदिनाथ कोठारेमुळे प्रचंड चर्चेत आली होती. आदिनाथ कोठारे व्यतिरिक्त या मालिकेत अजय पुरकर, सोनाली खरे, नेहा नाईक यांसारख्या कलाकारांची प्रमुख भूमिका आहेत. या मालिकेत दिग्गज कलाकारांची स्टारकास्ट पाहायला मिळाली. ही मालिका स्टार प्रवाह या चॅनेलवर रात्री 9 वाजता प्रसारत करण्यात आली होती.
प्रेक्षकांकडून या मालिकेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता. नंतर या मालिकेच्या वेळेत बदल करण्यात आला. दरम्यान, अवघ्या 7 महिन्यांत ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. स्टार प्रवाह चॅनेलने आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर 'नशीबवान' या मालिकेचा शेवटचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये आपण पाहू शकतो की, नागेश्वर हा गिरीजा अन् तिच्या आईचे प्रॉपर्टीच्या कागदपत्रांवर सही करुन घेतो. नंतर त्यांना बांधून घराला आग लावतो.
दरम्यान, रुद्रप्रताप हा दोघींना वाचवण्यासाठी घरात धाव घेतो. गिरीजा आणि त्याच्या आईचे प्राण वाचवतो. पण कागदपत्र घरातच राहतात. ते आणण्यासाठी नागेश्वर पुन्हा घरात जातो. परंतु, नागेश्वर आगीच्या विळख्यात अडकतो. 'नशीबवान' या मालिकेचा शेवटचा एपिसोड 25 एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजता प्रसारित होणार आहे. ही मालिका संपणार असल्याकारणाने प्रेक्षक तसेच चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
'आता हा अध्याय संपला'; घटस्फोट का घेतला? डिव्होर्सवर राहुल देशपांडे पहिल्यांदाच बोलला
