Budhaditya Rajyog 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 30 एप्रिल 2026 रोजी ग्रहांच्या चालीत एक खास बदल दिसणार आहे. या दिवशी बुद्धीचा कारक बुध ग्रह मेष राशीत प्रवेश करणार आहे. या ठिकाणी आधीपासूनच सूर्य ग्रह स्थित आहे. सूर्य आणि बुध ग्रहांचं एकत्र येणं ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीने फार शुभ मानलं जाणार आहे. या संयोगाला बुधादित्य राजयोग (Budhaditya Rajyog)म्हणतात. हा योग काही राशींसाठी धनसंपत्ती आणि प्रगतीचे संकेत घेऊन येणारा आहे.
ज्योतिष शास्त्रानुसार, जेव्हा सूर्य आणि बुध ग्रह एकाच राशीत असतात तेव्हा आपली विचारशक्ती मजबूत असते. या काळात तुम्हाला समाजात चांगला मान-सन्मान मिळेल. तसेच, करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ फार चांगला आणि शुभकारक असणार आहे. या काळात जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना लवकरच चांगली संधी मिळेल. तसेच, तुमच्या बिझनेसमध्ये प्रगतीचे संकेत आहेत. तुमची आर्थिक स्थिती अधिक चांगली असेल. उत्पन्नात चांगली वाढ झालेली असेल.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी नवीन ओळख मिळेल. ऑफिसधल्या लोकांची कामात स्तुती होईल. तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल. वैवाहिक जीवनात गोडवा निर्माण होईल. तसेच, जे लोक नवीन नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगली नोकरी मिळेल. व्यवसायात तुम्हाला एखादी मोठी डील मिळू शकते.
धनु रास (Saggitarius Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी बुधादित्य राजयोग भाग्याचा ठरणार आहे. या काळात तुम्ही अनेक नवीन योजना राबवाल. तसेच, तुमची रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येतील. मुलांच्या कलागुणांना चांगला वाव मिळेल. तसेच, परदेशात जाण्याची संधी मिळेल. उत्पन्नाची नवी साधनं निर्माण होतील. मित्रांच्या सहकार्याने तुमची कामे सहज पूर्ण होतील.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
