Rahul Deshpande Divorce Reason: राहुल देशपांडे (Rahul Deshpande). गायन आणि अभिनयातून विशेष ओळख निर्माण करणारे कलाकार बऱ्याचदा वैयक्तिक कारणांमुळेही चर्चेत असतात.  राहुल हे शास्त्रीय गायक वसंतराव देशपांडे यांचे  नातू आहेत.  त्यांनी आपल्या कलेतून एक वेगळी ओळख निर्माण केली. राष्ट्रीय पुरस्कार विजेता राहुल यांनी अलिकडेच मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यावर भाष्य केलं. राहुल यांनी आपल्या पत्नीसोबत काडीमोड घेतला. घटस्फोट घेण्यामागचं कारण काय?  यावर त्यांनी भाष्य केलंय.   

Continues below advertisement

काही महिन्यांपूर्वी राहुल देशपांडे हे आपल्या पत्नीला दिलेल्या डिव्होर्समुळे चर्चेत आले होते. यानंतर राहुल देशपांडेंच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. राहुल देशपांडेंनी घटस्फोट का घेतला? असे अनेक प्रश्न अनुत्तरित होते. अलिकडेच त्यांनी मित्र म्हणेला मुलाखत दिली होती.  या मुलाखतीत त्यांनी डिव्होर्सबाबत भाष्य केलं आहे. तसेच डिव्होर्सनंतर करण्यात आलेल्या ट्रोलिंगवरही प्रतिक्रिया दिली. 'एक  कलाकार म्हणून मी प्रामाणिक व्यक्ती आहे.  रेणूका, मी आणि माझ्या लेकीचे एकत्रित अनेक फोटो तुम्हाला दिसतील'. 

राहुल देशपांडेंनी घटस्फोट का घेतला यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे (Why Rahul Deshpande separated from his wife)

'मला असं वाटलं की ही माझी एक जबाबदारी  आहे. जे मला फॉलो करतात,  समाजात जे माझे चाहते, 'हा अध्याय संपला आहे' एवढंच या पोस्टमागचा हेतू होता, एवढंच सांगणं होतं', असं त्यांनी म्हटलं. 'आमच्या दोघांमधील संबंध अजूनही चांगले आहेत. आम्ही दोघे रेणूकाचे आई - वडील आहोत, आणि कायम राहू', असंही त्यांनी आपल्या मुलाखतीत म्हटलं. 

Continues below advertisement

ट्रोलिंगवर राहुल देशपांडे नेमकं काय म्हणाला? (Rahul Deshpande Response to Trolling)

'मी आजवर बऱ्याच ट्रोलिंगचा सामना केला आहे. ती पोस्ट केल्यानंतर मला खूप फोन आले होते. मी एकही फोन घेतला नाही. हा माझा वैयक्तिक विषय आहे. मी बरोबर कसा, माझ्यावर अन्याय कसा झाला, हे सांगण्यात मला बिलकूल रस नव्हता.. कारण असं काही घडलेलं नाही', असंही राहुल यांनी स्पष्ट केलं.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'तारक मेहता का उल्टा चश्मा'मधील पोपटलालचं खऱ्या आयुष्यात लग्न झालंय? त्याच्या पत्नीचे सौंदर्य पाहून डोळे फिरतील