मुंबई : स्क्विड गेम या वेब सिरिजच्या दुसऱ्या सिझनची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. दरम्यान आज म्हणजेच 26 जानेवारी रोजी या बेव सिरिजचा हा दुसरा सिझन रिलिज झाला आहे. पहिल्या वेब सिरिजप्रमाणेच दुसऱ्या वेब सिरिजमध्येही थरारक प्रसंग आहेत. या दुसऱ्या सिझनमध्ये क्षणोक्षणी प्रेक्षक खिळून राहतो. त्यामुळेच या सिझनमध्ये पाहण्यासारखं काय आहे? यात कोणत्या बाबी जुळून आल्या आहेत? दिग्दर्शक नेमका कुठे कमी पडला आहे? हे रिव्ह्यूच्या माध्यमातून जाणून घेऊ या...


स्क्विड गेम या वेब सिरिजचा दुसरा सिझन तुम्हाला नेटफ्लिक्सवर पाहता येईल. या वेब सिरिजाचे पहिले सिझन 2021 मध्ये आले होते.ही एक दक्षिण कोरियात तयार करण्यात आलेली कलाकृती आहे.  


दुसऱ्या सिझनची कहाणी काय आहे?


पहिल्या सिझनमध्ये 456 वेगवेगळ्या खेळाडूमध्ये भयंकर खेळ खेळण्यात येतो. या खेळात पराभव झाल्यास थेट त्या खेळाडूचा मृत्यू होतो किंवा त्याला मारलं जातं. या खेळात 456 क्रमांकाचाच खेळाडू जिंकतो. उर्वरित सर्वांनाच मारून टाकलं जातं. त्यानंतर आता स्क्विड गेमच्या दुसऱ्या सिझनमध्ये हाच 456 क्रमांकाचा खेळाडू पुन्हा एकदा हा जीवघेणा खेळ खेळायला जातो. पहिल्या सिझनमध्ये या खेळाडूला भरपूर सारे पैसे मिळालेले असतात. पण असे असूनही तो खेळाडू दुसऱ्या सिझनमध्ये पुन्हा एकदा जीवघेणा खेळ खेळायला जातो. दुसऱ्या सिझनमध्येही डोक्यावर खूप सारं कर्जाचं ओझं असणारे आणि त्यातून मुक्त होऊ पाहणारे लोक हा खेळ खेळण्यासाठी येतात. त्यानंतर पुन्हा एकदा मृत्यूचा खेळ चालू होतो. यावेळी मात्र प्रत्येक खेळ वेगळा आहे. सोबतच खेळाडूंना काही नवे टास्क देण्यात आलेले आहेत. त्यामुळे या दुसऱ्या सिझनमध्ये कोण जिंकणार? 456 क्रमांकाच्या खेळाडूचे नेमके काय होणार? हे पाहण्यासाठी नेटफ्लिक्सवर स्क्विड गेम या वेबसिरिजचा दुसरा सिझन पाहायलाच हवा. या दुसऱ्यास सिझनमध्ये एकूण 7 एपिसोड आहेत. हा प्रत्येक एपीसोड जवळपास 1 तासाचा आहे. पहिल्या सिझनमध्ये एकूण 9 एपिसोड आहेत.  


वेब सिरिज नेमकी कशी आहे? 


पुढे मजबुरी असेल तर माणूस काहीही करायला तयार होतो, असेच या वेब सिरिजमध्ये सांगण्यात आलंय. याच मजबुरीचा काहीजण फायदा घेतात, असं या वेबसिरिजमध्ये दाखवण्यात आलंय. सुरुवातीचे दोन एपिसोड फारसे चांगले वाटत नाहीत. नंतरच्या एपिसोडमध्ये मात्र मृत्यूचा थरारक खेळ पाहायला मिळतो. या वेब सिरिजच्या दुसऱ्या सिझनमध्ये प्लेयर नंबर 456 सोडून बाकीचे सर्व खेळाडू नवे आहेत. याच खेळाडूंमध्ये एक दाम्पत्य दाखवण्यात आलंय. यातील महिला गर्भवती आहे. अन्य खेळाडूंमध्ये आई आणि मुलगा आहे. तुम्ही सिरीजचे एपिसोड जसे-जसे पाहात जाल तसे तसे खुनाचा खेळ चालू होतो. त्यात एक-एक जणाचा मृत्यू होत जातो. तुलनाच करायची झाल्यास या वेब सिरिजचा पहिला सिझन दुसऱ्या सिझनपेक्षा चांगला वाटतो. दुसऱ्या सिझनमध्ये फारसे काही वेगळे नाही. कुठे कुठे ही वेब सिरीज पाहताना कंटाळा येतो. दुसऱ्या सिझनमधील एक खेळ फारच रंजक आहे. यात अचानक एक ग्रुप करून एका खोलीत जायचे असते. त्यानंतर त्या खोलीत गेलेले एकमेकांचे शत्रू होतात आणि एकमेकांविरोधात लढा देतात.  


अभिनय कसा आहे?


या दुसऱ्या सिझनमध्ये  Lee Jung-jae, Wi Ha-joon, Lee Byung-hun, Im Si-wan, Kang Ha-neul, Lee Jin-wook, Park Sung-hoon, Yang Dong-geun, Jo Yu-ri, Kang Ae-shim तसेच  Lee Seo-hwan यांनी उत्तम दर्जाचा अभिनय केलेला आहे. प्रत्येक कालाकारने त्याच्या पात्राला पूर्णपणे न्याय दिला आहे. विशेष म्हणजे LEE JUNG JAE यांनी केलेला अभिनय प्रशंसनीय आहे. HWANG DONG HYUK यांनी या दुसऱ्या सिझनचे दिग्दर्शन केलेले आहे. मात्र पहिल्या सिझनच्या तुलनेत दुसऱ्या सिझनमध्ये त्यांचे काम फारसे चांगले नाही. जेवढी अपेक्षा केली होती, तेवढा दर्जा या दुसऱ्या सिझनमध्ये कायम राखता आलेला नाही. अर्थात या वेब सिरिजचे दुसरे सिझन एकदा पाहण्यासारखे आहे. पणे पहिल्या सिझनच्या तुलनेत हा दुसरा सिझन थोडं निराश करतो. 


रेटिंग- 3 स्टार्स  


हेही वाचा :


पापाराझी दिसताच राहाकडून फ्लाइंग किस, चिमुरड्या परीच्या फोटोंची चर्चा, रणबीर-आलियालाही फुटलं हसू!


श्रद्धा कपूर वरुण धवनच्या आकंठ प्रेमात, प्रपोजही केलं पण..., नकार दिल्यावर केलं होतं भयंकर कृत्य!