Shraddha Kapoor Proposal: बॉलिवुडमधील आघाडीचा अभिनेता वरुण धवन सध्या त्याच्या बेबी जॉन या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. तो वेगेवगळ्या संस्था, मीडिया चॅनेल्स तसेच यूट्यूबर्सने मुलाखती देत आहे. अशाच एका पॉडकास्टमध्ये त्याने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. अभिनेत्री श्रद्धा कपूरने मला प्रपोज केले होते. मी नकार दिल्यानंतर तिने तिच्या मित्रांकडून मला मारहाणही केली होती, असं वरुण धवनने हसत-हसत सांगितले आहे. 

Continues below advertisement


श्रद्धा कपूरने केलं होतं प्रपोज


वरुण धवन आणि श्रद्धा कपूर हे एकमेकांचे चांगले मित्र आहेत. दोघेही एकमेकांना लहानपणापासून ओळकतात. त्यांच्यात चांगली मैत्री असल्यामुळे ते एकमेकांचे चांगलीच थट्टा-मस्करी करताना दिसतात. शुभंकर मिश्राच्या याच पॉडकास्टमध्ये बोलताना वरुण धवनने लहानपणाचा एक किस्सा सांगितला आहे. श्रद्धा कपूर 8 वर्षांची असताना तिने मला तिच्या मित्रांच्या माध्यमातून मारहाण केली होती. तसेच तिने मला प्रपोज केले होते, असे वरुणने सांगितले आहे. 


नेमका किस्सा काय आहे? 


श्रद्धा कपूर आणि वरुण धवन तेव्हा लहान होते. त्यांच्या लहाणपणीचा हा किस्सा आहे. खुद्द वरूण धवनने सांगितल्याप्रमाणे श्रद्धा कपूर तेव्हा अवघ्या 8 वर्षांची होती. तेव्हा मी तिला आवडायचो. विशेष म्हणजे त्या वयात तिने मला प्रपोजही केले होते. वरुण धवने मात्र तिला नकार दिला होता. ही आठवण सांगताना, "तेव्हा आम्ही खूप लहान होतो. त्या वयात काही समज नसते. त्या वयात एखादा मुलगा एखाद्या मुलीवर कसं प्रेम करू शकतो. श्रद्धा मला तेव्हा डोंगरावर घेऊन गेली होती. तेव्हा तिने मला प्रपोज केले होते. त्यानंतरची स्टोरी मी तुम्हाला सांगतो," असे वरुण धवनने सांगितले. 


प्रपोजल रिजेक्ट केल्यामुळे...


त्यानंतर बोलताना वरुण धवन म्हणाला की, "दोन वर्षांनंतरही श्रद्धाला मी नकार दिल्याचं लक्षात होतं. श्रद्धा कपूरचा 10 वा वाढदिवस होता. तिच्या वाढदिवसासाठी तिने मला बोलावलं. तेव्हा श्रद्धाने झगा परिधान केलेला होता. त्यावेळी श्रद्धा साधारण चार मुलांना आवडायची. याच मुलांनी मला अचानक घेरलं. तुला श्रद्धा का आवडत नाही? असं त्यांनी मला विचारलं. तुला श्रद्धाला पसंद करावंच लागेल, असं सांगत त्यांनी माझ्याशी भांडण चालू केलं. तेव्हा त्या मुलांनी मला मारलं. मी श्रद्धाचं प्रपोजल नाकारल्यामुळे तिने मला तिच्या मित्रांकडून मार खायला लावला. त्यानंतर बर्थडेच्या वेळी आयोजित करण्यात  आलेल्या डान्स स्पर्धेत मी भाग घेतला आणि मी जिंकलोदेखील. त्या स्पर्धेत श्रद्धा तिसऱ्या क्रमांकावर होती," अशी गोड आठवण वरुण धवनने हसत हसत सांगितली. 


हेही वाचा :


ब्युटी विथ ब्रेन! वेळप्रसंगी मुलांचं ट्युशन घेतलं, पण स्वप्न पूर्ण केलंच, परदेश सोडून आलेल्या IPS अधिकारी पूजा यादव कोण आहेत?


कियाराला किस, आलियाशी फ्लर्ट, वरुण धवनने लाईव्ह शोमध्ये पातळी सोडली? खुद्द त्यानेच सांगितलं 'त्या' कृत्यामागचं सत्य!