Sardar Box Office Collection : साऊथ मध्ये सध्या एकामागोमाग एक हिट चित्रपटांची रांग लागली आहे. या चित्रपटांत आता 'सरदार' (Sardar) चित्रपटाची देखील वर्णी लागली आहे. नुकताच 21 ऑक्टोबरला रिलीज झालेला सरदार हा सिनेमा काहीदिवसांतच मोठा हिट ठरला आहे. साऊथच्या या थ्रिलर चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगलीच पसंती मिळत आहे. या चित्रपटात अभिनेता कार्थी (Karthi) मुख्य भूमिकेत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे.
दिवाळीच्या सुट्ट्यांचा चित्रपटाला फायदा
बुधवारी दिवाळीच्या सुट्टीनंतर पहिल्याच दिवशी सरदार चित्रपटाने चांगली पकड घेतली. या चित्रपटाने जवळपास 4.75 कोटींची कमाई केली होती. मंगळवारी दिवाळीची सुट्टी संपली असली तरी, काल काही सुट्ट्यांची मागणी दिसून आली. विशेषत: लहान केंद्रांमध्ये त्यांनी चेन्नईसारख्या मोठ्या केंद्रांना मागे टाकले. ज्यांच्या कमाईचे आकडे आधीच्या दिवसापेक्षा जास्त होते. तुलनेत जास्त होते.
भारतीय बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची कमाई
सुपरस्टार कार्थीच्या सरदार चित्रपटाने भारतात पहिल्याच दिवशी 6 कोटींची कमाई केली. यानंतर दुसऱ्या दिवशी 7 कोटी, तिसऱ्या दिवशी 8 कोटी, चौथ्या दिवशी 10.25 कोटी, पाचव्या दिवशी 8.50 कोटी आणि सहाव्या दिवशी आलेल्या रिपोर्टनुसार 4.75. अशाप्रकारे सरदार यांची भारतातील एकूण कमाई 44.50 कोटी झाली आहे. अशा परिस्थितीत सरदार हा तमिळ चित्रपट या वर्षातील आणखी एक हिट चित्रपट होण्याच्या मार्गावर आहे, असे आता म्हणता येईल.
अप्रतिम कथा आणि संकल्पना
21 ऑक्टोबरला सरदार चित्रपट तमिळ भाषेत चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. सणासुदीच्या काळात कार्थीच्या सरदार चित्रपटाला खूप फायदा झाला आहे. या चित्रपटाने आपल्या अप्रतिम कथा संकल्पनेने सर्वांची मने जिंकली आहेत. कार्थीचा सरदार हा एक स्पाय थ्रिलर चित्रपट आहे, जो प्रेक्षकांना खूप आवडला आहे.
चित्रपटाची तगडी स्टार कास्ट
सरदार या चित्रपटात दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कलाकार कार्थी (Karthi), राशि खन्ना आणि चंकी पांडे यांनी प्रमुख भूमिका साकरली आहे. या चित्रपटात अभिनेता कार्थीनं डबल रोल केला आहे. बाकी कलाकारांच्या भूमिकेला देखील प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. निर्मात्यांनी हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवसापासूनच 'सरदार'ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या :
Sardar Twitter Review: 'कांतारा' नंतर आता 'सरदार' ची चर्चा; सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव