south indian stars :  बॉलिवूडमधील अनेक कलाकार सध्या दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करतायत तसेच दाक्षिणत्य चित्रपटांमधील कलाकार देखील बॉलिवूडमध्ये काम करतात. बाहुबली या चित्रपटामधून विशेष लोकप्रियता मिळवणारा अभिनेता प्रभासने देखील बॉलिवूड चित्रपटांमध्ये पदार्पण केले. लवकरच काही दाक्षिणात्य स्टार्स हे बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे. बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारे दाक्षिणात्य कलाकार कोणते ते पाहूयात....
 
समंथा (Samantha)


पुष्मा चित्रपटातील आयटम साँगमुळे अभिनेत्री समंथा सध्या चर्चेत आहे. समंथाने फॅमिली मॅन या हिंदी वेब सीरिजमध्ये काम केले आहे. पण लवकरच आता ती एका हिंदी चित्रपटात काम करून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात समंथा आणि अभिनेत्री तापसी पन्नूची प्रमुख भूमिका असणार आहे, असं म्हटलं जातंय. 


रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna)
नॅशनल क्रश असणारी रश्मिका लवकरच बॉलिवूड चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. रश्मिका सिद्धार्थ मल्होत्राच्या  मिशन मजनब या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तसेच अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेल्या  गुडबाय या चित्रपटामध्ये देखील रश्मिका काम करणार आहे. 2016 मध्ये रश्मिकाचा पहिला सिनेमा प्रदर्शित झाला होता. रश्मिकाने कन्नड सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर तिने सलग हिट सिनेमांमध्ये काम केले.
 
विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda)
दाक्षिणात्य सुपर स्टार विजय देवरकोंडा हा त्याच्या लायगर या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटामधील अनन्या पांडे आणि विजय देवरकोंडा या जोडीची केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 


नागा चैतन्या (Naga Chaitanya)
अभिनेता नागा चैतन्य हा लाल सिंह चड्ढा या चित्रपटामध्ये काम करणार आहे. या चित्रपटात तो बाला नावाच्या व्यक्तीची भूमिका साकारणार आहे. 


संबंधित बातम्या


Deepika Padukone : ...म्हणून शूटिंग सेटवर दीपिका घेऊन जाते रंगीत पेन्सिल बॉक्स!


Deepika Padukone : ...अनुष्काप्रमाणेच दीपिकाही झाली असती एका क्रिकेटपटूची पत्नी; लव्ह स्टोरी माहितीये?


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडीSamantha, पाहा लाईव्ह - ABP Majha