Priyamani Birthday : साऊथ चित्रपटांमधील प्रसिद्ध अभिनेत्री प्रियामणीचा (Priyamani) आज 38 वा वाढदिवस आहे. द फॅमिली मॅन (The Family Man) या वेब सीरिजमुळे प्रियामणीला विशेष लोकप्रियता मिळाली. तिचा जन्म 4 जून 1984 रोजी बंगळुरू येथे झाला. प्रियामणीने साऊथसोबतच बॉलिवूडमध्येही स्वत:ची विशेष ओळख निर्माण केली आहे. चेन्नई एक्सप्रेस या चित्रपटात तो शाहरुख खानसोबत (Shah Rukh Khan) वन टू थ्री फोर या गाण्यात परफॉर्म करताना दिसला होता.
द फॅमिली मॅन-1 आणि द फॅमिली मॅन 2 या वेब सीरिजमध्ये प्रियामणीनं मनोज बाजपेयीसोबत काम केले. या सीरिजमधील दोघांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या सीरिजमध्ये प्रियामणीनं मनोज बाजपेयी यांच्या पत्नीची भूमिका साकारली होती. यासोबत ती हिज स्टोरी या वेब सीरिजमध्येही प्रियामणीनं पिरमुख भूमिका साकारली. प्रियमणीने वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी 2003 मध्ये आलेला तेलुगु चित्रपट एवारे अटागाडूमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. प्रियमणीनं आत्तापर्यंत 61 चित्रपटांमध्ये काम केले आहे.
प्रियामणी आणि विद्या बालन यांचे कनेक्शन
अभिनेत्री प्रियामणी आणि अभिनेत्री विद्या बालन या चुलत बहिणी आहे. प्रियमणीला सहा भाषा येतात. प्रियमणीला 2006 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे.
2009 मध्ये रिलीज झालेल्या 'द्रोण' चित्रपटात अभिनेत्री प्रियमणी तिच्या बोल्ड आणि हॉट लूकमध्ये दिसली होती. या चित्रपटातील तिच्या बिकिनी लूक हा चर्चेत होता. या चित्रपटामधील प्रियमणीच्या बिकिनीमुळे अनेकांनी तिला ट्रोल केले होते.
हेही वाचा :
- Entertainment News Live Updates 4 June : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
- S. P. Balasubrahmanyam Birth Anniversary : ‘दक्षिणेतील रफी’ अशी ओळख, ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्येही कोरले नाव! वाचा एस. पी. बालासुब्रमण्यमबद्दल...