South Actress On Producer Demand Physical Relation: फिल्म इंडस्ट्रीत (Film Industry) आपलं नशीब आजमावण्यासाठी अनेकजण दररोज मुंबईत (Mumbai News) येत असतात. काहीचं नशीब उजळतं, त्यांना संधी मिळते, तर काहीजण प्रयत्न करत राहतात... यापूर्वीही आपण अनेक अभिनेत्रींच्या (Actress) तोंडून त्यांना आलेले कास्टिंग काऊचचे धक्कादायक अनुभव ऐकले आहेत. फक्त अभिनेत्रीच नाहीतर अनेक अभिनेतेही कास्टिंग काऊचला (Casting Caouch) बळी पडल्याचं धक्कादायक वास्तवही समोर आलं आहे. असाच धक्कादायक अनुभव नुकताच एका साऊथ इंडस्ट्रीतल्या (South Industry) अभिनेत्रीनं शेअर केला आहे.
एक साऊथची सुपरस्टार अभिनेत्री, तीसुद्धा इंडस्ट्रीतल्या ओरबाडणाऱ्या लांडग्यांपासून वाचू शकलेली नाही. या अभिनेत्रीकडे निर्मात्यांनी अश्लील मागणी केलेली. धक्कादायक बाब म्हणजे, ज्यावेळी अभिनेत्री सिनेमाचं शुटिंग करत होती, त्यावेळी निर्माते तिला 'मोठ्या बहिणीचा' दर्जा देत होते. शुटिंगच्या सेटवर ते तिला हाकही 'मोठी बहिण' अशीच मारत होते.
दोन्ही निर्मात्यांना आपल्या भावाचा दर्जा देणाऱ्या अभिनेत्रीच्या पायाखालची जमीन तेव्हा सरकली, ज्यावेळी तिला दोघांकडून अचानक शारीरिक संबंध ठेवण्याबाबत विचारण्यात आलं. आम्ही ज्या अभिनेत्रीबाबत सांगत आहोत, ती अभिनेत्री दुसरी-तिसरी कुणी नसून चारमिला क्रिस्टीना आहे, जिला अत्यंत वेदनादायी आणि घाणेरडा अनुभव आला. स्वतः अभिनेत्रीनं एका मुलाखतीत बोलताना याबाबत सांगितलं होतं.
'मला दीदी... दीदी म्हणायचे...'
48 वर्षांच्या चारमिला क्रिस्टीना हिनं खुलासा केला की, ती कालिकतमध्ये एका मल्याळम चित्रपटाचं चित्रीकरण करत होती. या चित्रपटात तिनं एका आईची भूमिका साकारली होती. निर्माते तिच्या वयाच्या अर्ध्या वयाचे होते आणि तिला 'दीदी' म्हणायचे. चारमिला क्रिस्टीना हिनं एका मुलाखतीत सांगितलेलं की, निर्मात्यांनी असं काही केलं ज्यावर तिला विश्वास बसत नव्हता.
खरं तर, तिच्या मुलाच्या वयाच्या निर्मात्यांनी शुटिंग सुरू असतानाच तिला शारीरिक संबंध ठेवण्याबाबत थेट विचारणा केली. तिला सांगण्यात आलं की, पैशाच्या बदल्यात ती दोन निर्मात्यांपैकी एकाशी शारीरिक संबंध ठेवू शकते. ही मागणी ऐकून चारमिला क्रिस्टीनाला धक्का बसला. तिच्या पायाखालची जमीन हादरली होती.
अभिनेत्री निर्मात्यांच्या 'त्या' घाणेरड्या मागणीनं पुरती हादरुन गेलेली. चारमिला क्रिस्टीना हिंमत करुन त्या निर्मात्यांशी बोलली. तिनं त्यांना सांगितलं की, मी तुमच्या आईसारखी आहे. निर्मात्यांनी तिचं ऐकलं नाही, तिच्याकडे नको त्या, घाणेरड्या मागण्या करतच राहिले. अखेर अभिनेत्रीनं शूटिंग सोडून चेन्नईला परतण्याचा निर्णय घेतला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :