Sonyaa Ayodhya Of Kasauti Zindagi Kay 2 Divorce: आपल्या अभिनयानं टेलिव्हिजन जगतात (Television World) स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री सोन्या अयोध्या अलिकडेच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. लग्नाच्या पाच वर्षांनी अभिनेत्रीचा घटस्फोट झाल्याची माहिती मिळत आहे. अभिनेत्री सोन्या अयोध्या (Sonyaa Ayodhya) पती हर्ष सामोरपासून (Harsh Samorre) कायदेशीररित्या विभक्त झाली आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये अनेक वाद-विवाद सुरू झाले होते. सोन्या अयोध्या आणि हर्ष सामोर यांपैकी कुणीच घटस्फोटाबाबत काहीही बोललेलं नाही. सुत्रांनी दोघांच्या घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण झाली असल्याची माहिती दिली आहे.
सोन्या अयोध्या (Sonyaa Ayodhya) आणि हर्ष समोरे (Harsh Samorre) यांच्या निकटवर्तीयांनी नाव न घेण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, एप्रिलमध्येच दोघांच्या घटस्फोटाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सोन्या अयोध्या आणि हर्ष सामोर यांच्यात गेल्या बऱ्याच दिवसांपासून वाद वाढला होता. गेल्या वर्षा ऑक्टोबरमध्येच दोघांमधील मतभेदांबाबतच्या चर्चा दबक्या आवाजात सुरू होत्या. सोन्या अयोध्या आणि हर्ष सामोर यांनी सोशल मीडियावरही एकमेकांना अनफॉलो केलंय. एवढंच काय तर त्यांनी सोशल मीडियावरुन दोघांच्या लग्नाचे फोटोही डिलीट करून टाकले आहेत.
एकीकडे घटस्फोटाच्या चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे सोन्या अयोध्यानं सोशल मीडियावर एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केलेली. ज्यामुळे लोकांचा संशय आणखी वाढला होता. सोन्या अयोध्यानं क्रिप्टिक पोस्टमध्ये लिहिलेलं की, "कोणीतरी मला विचारलं, 'तू तुझी बाजू सांगणार नाहीस का?' मी उत्तर दिलं, 'माझी बाजू देवाला माहिती आहे आणि ते पुरेसं आहे." सान्या व हर्ष आता एकत्र कुठेच दिसत नाही. फोटोही हटवले आहेत."
दरम्यान, सोन्या अयोध्या आणि हर्ष सामोर यांचं डिसेंबर 2019 मध्ये लग्न झालेलं. दोघांनी जयपूरमध्ये डेस्टिनेशन वेडिंग करत थाटामाटात लग्नगाठ बांधली होती. या सोहळ्यात कुटुंब आणि जवळचे मित्र उपस्थित होते. त्यावेळी सोन्यानं सांगितलेलं की, एवढ्या थाटामाटात लग्न करणं ही तिच्या कुटुंबीयांची इच्छा होती.
महत्त्वाच्या इतर बातम्या :