Mumbai : क्रिकेटच्या देवानंतर आता अभिनेता सोनू सुदचाही (Sonu Sood) डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये फसवणूक करणारा व्यक्ती लोकांना पैसे मागताना दिसत आहे. सोनू सुदने व्हिडिओ शेअर करुन स्वत: याबाबतची माहिती दिली आहे. काही दिवसांपूर्वी  एका अॅपच्या जाहिरातीसाठी  सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) डीपफेकचा वापर करण्यात आला होता. मात्र, सोनू सुदचे (Sonu Sood) प्रकरण वेगळे आहे. या डीपफेकमधून सामान्य लोकांकडून पैशाची मागणी केली जात आहे. सोनू सुदच्या नावाने लोकांची फसवणूक करण्याचा प्रकार सुरु आहे. 


सोनू सुद (Sonu Sood) हा व्हिडिओ त्याच्या ट्वीटर हँडलवरुन शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत सोनू सुदने लिहिले की, "माझा फतेह हा चित्रपट खऱ्या आयुष्यातील घोटाळा दाखवणारा आहे. मात्र, आता काही लोकांनी माझ्या नावाने सामान्य लोकांची फसवणूक सुरु केली आहे. आरोपींनी माझा चेहरा वापरुन काही कुटुंबाशी संपर्क केला. शिवाय त्यांच्याकडून पैसेही मागितले आहेत. या लोकांच्या फसवणुकीला काही लोक बळी पडले आहेत. माझी लोकांना विनंती आहे की, अशा लोकांपासून सतर्क रहा."


सचिनचा डिपफेक वापरुन अॅपची जाहिरात 


यापूर्वी भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकरही (Sachin Tendulkar) डीपफेकचा शिकार होता. मुलगी सारा आणि खुद्द सचिनचाच डीपफेक (Deepfake) व्हिडिओ व्हायरल झाल्याने त्याने (Sachin Tendulkar) याबाबत दु:ख व्यक्त केले होते. सोशल मीडियावर सचिन आणि त्याची मुलगी सारा तेंडुलकर हिचा डीपफेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. सचिनने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करुन हा खोटा आणि डीपफेक असल्याचे म्हटले होते. दरम्यान, सचिननंतर आता सोनूही डिपफेकचा शिकार झालाय. 


रश्मिकापासून सुरु झाली डिपफेकची मालिका 


डिपफेकचे हे बॉलिवूडमधील पहिलेच प्रकरण नाही. सर्वप्रथम अभिनेत्री रश्मिका मांदना डिपफेकची शिकार झाली होती. काही महिन्यांपूर्वी कृत्रीम बुद्धीमतेच्या (AI) मदतीने सेलिब्रिटींचे डीपफेक व्हिडिओ बनवून व्हायरल करण्यात येत होते. रश्मिकाचा व्हिडिओ अशाच प्रकारे व्हायरल करण्यात आला होता.  मात्र, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अमिताभ बच्चन यांच्यापासून अनेकांना रश्मिकाच्या डीपफेकबाबत भाष्य केलं होते. दरम्यान सोनू सुदने व्हिडिओ पोस्ट करुन लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Bigg Boss 17 : अंकिता लोखंडेच्या 'या' 7 चुका बिग बॉसच्या ट्रॉफीपासून दूर नेणार?