Bigg Boss 17 : अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) तिच्या बिग बॉसमधील (Bigg Boss 17) गेममुळे सध्या तुफान चर्चेत आहे. बिग बॉस 17 मधील अंकिताचा गेम जास्त चर्चेत नव्हता. तिच्या पतीबरोबर झालेल्या वादाच्या जास्त चर्चा होत होत्या. त्यामुळे अंकिताचे गेममध्ये टिकणे मुश्किल होणार आहे. अंकिता लोखंडे 7 मोठ्या चुका केल्या आहेत. या चुकांमुळेच ती बिग बॉसच्या ट्रॉफीपासून (Bigg Boss 17) दूर जाताना दिसत आहे. अंकिता बिग बॉस 17 च्या सिझनमध्ये कोणत्या चुका केल्या आहेत. जाणून घेऊयात...
अंकिताला नाती टिकवणे जमले नाही
अभिनेत्री अंकिता लोखंडे या शोमध्ये दाखल झाली त्याला आत्ता 13 आठवड्यांचा काळ लोटला आहे. मात्र, तिला काळात चांगली नाती टिकवता आली नाहीत. तिने नवीन नाते निर्माण करण्याचा प्रयत्नही केलेला नाही. चांगले संबंध निर्माण करण्यात ती अपयशी ठरली आहे. ईशा, अभिषेक आणि मुन्नवर फारुकी सोबत तिचे नाते बिघडतानाच दिसले आहेत.
पती विकी जैन याच्याशीच स्पर्धा
बिग बॉसच्या 17 व्या सीझनमध्ये अंकिता लोखंडेची स्पर्धा पती विकी जैन याच्याशीच रंगली आहे. विकी जैननेही तिला तगडे तगडी स्पर्धा निर्माण केली आहे. या सीझनमध्ये अंकिता पेक्षा तिच्या पतीने चांगला गेम केला आहे. प्रेक्षकांनाही विकी जैनच्या कामगिरीला चांगला प्रतिसाद दिला आहे.
पतीसोबतचा वाद अंकिता लोखंडेच्या अडचणी वाढवणार
बिग बॉस चालू सीझनमध्ये अंकिता आणि विकी जैन यांच्या वाद सुरुच आहे. दोघांमध्ये चांगले नाते किंवा काही प्रमाणात प्रेम लोकांना पाहायला मिळालेले नाही. दोघेही शोमध्ये कायम भांडतानाच दिसले आहेत.
अंकिताची नेगेटिव्ह इमेज
पती विकी जैनसोबतच्या वादामुळे अंकिताची नेगेटिव्ह इमेज तयार झाली आहे. अंकिताला ती सुरक्षित नाही, असेच वाटत होते. शिवाय, ती पजेसिव्हही होती. त्यामुळे या सर्व बाबींचा परिणाम तिला स्पर्धेत भोगावा लागणार आहे.
अंकिताचा कोणाशीही मोठा वाद नाहीच
अंकिता लोखंडेचा स्पर्धेत कोणाशीही तगदा वाद झाला नाही. काही वेळेस भांडण झाली आहेत. मात्र, त्यानंतर काही क्षणांत अंकिता त्या व्यक्तीबरोबर मैत्री करते. त्यामुळे तिचा गेम प्रेक्षकांना संभ्रमात टाकत आहे.
सुशांतच्या आठवणी सांगणेही अंकितावर पडणार भारी
एक्स बॉयफ्रेंड सुशांत याच्या सातत्याने आठवणी सागणे, हे अंकिताला भारी पडू शकते. अनेक चाहत्यांना तिची ही कृती आवडलेली नाही. त्यामुळे अंकिता ट्रोल देखील झाली आहे. लोक ती सहानभूती मिळवण्यासाठी या आठवणी सांगत असल्याचे म्हणत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या
Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya Trailer Out: रोबोट आणि माणसाची भन्नाट प्रेमकहाणी; 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया'चा जबरदस्त ट्रेलर रिलीज