Sonu Nigam Hospitalised : प्रसिद्ध गायक सोनू निगम याला चेंबूरमधील एका कार्यक्रमात धक्काबुक्की झाल्याचं समोर आले आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. चेंबूरमध्ये लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान सोनू निगम याच्यासोबत धक्काबुक्की झाल्याचं समोर आले आहे. सोनू निगमला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
 
मुंबईमधील चेंबूर येथे कॉन्सर्ट दरम्यान सोनू निगम याच्यासोबत धक्काबुक्की झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. याबाबत सह पोलिस आयुक्त (कायदा सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी म्हणाले की, सोनू निगम याला धक्काबुक्की झाली आहे. या प्रकरणाबाबत आम्ही अधिक माहिती घेत आहोत. आतापर्यंत या प्रकरणी कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. ही धक्काबुक्की का झाली? कुणी केली ? याबाबतची माहिती मिळालेली नाही. याप्रकरणाची आम्ही चौकशी करत आहोत. 

Continues below advertisement


ठाकरे गटाचे आमदार प्रकाश फातर्पेकर यांच्या माध्यमातून चेंबूर महोत्सव आयोजन करण्यात आलं होतं. याच कार्यक्रमात सोनू निगम याच्या गाण्याच्या कार्यक्रमाचं आयोजनं  करण्यात आलं होतं. कार्यक्रम संपल्यानंतर जेव्हा सोनू निगम स्टेजवरून खाली जात होता, तेव्हा सोनू निगमसोबत सेल्फी घेण्यासाठी लोकांनी धावपळ केली. यामध्ये धक्काबुक्की झाली आणि सोनू निगम यांचा एक टीम मधील माणूस स्टेजवरून खाली पडला. त्याला जवळच्या जेन रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्या ठिकाणी त्यांनी एक्स-रे काढल्यानंतर औषध घेऊन डिस्चार्ज देण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  सोनू निगम सुखरूप आहे. या प्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा अथवा तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.  


सोनू निगम याला धक्काबुक्की झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत स्पष्ट काहीच दिसत नाही. पण ट्वीटर युजर समित ठक्कर (Sameet Thakkar) यानं एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. यात त्यानं दावा केलाय की, उद्धव ठाकरे गटाचे आमदार प्रकाश फातर्पेकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सोनू निगमला धक्काबुक्की केली. सोनू निमगला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. याबाबत पोलीस तपास करत आहे. याबाबत अद्याप कोणताही तक्रार दाखल झालेली नाही.  






चुकीची माहिती पसरवणाऱ्यावर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल करवा, अशी मागणी ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्वीट करत केली आहे. 




आणखी वाचा :


Bhagat Singh Koshyari: कंगना मला भेटायला आली मग त्यांचा जळफळाट का? माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा सवाल