Khushi Mukherjee Trolled: अभिनेत्री खुशी मुखर्जी (Khushi Mukherjee) सोशल मीडियावर (Social Media) खूप सक्रीय आहे. ती तिचा लूक, फोटो आणि व्हिडीओंमुळे दररोज चर्चेत असते. सोशल मीडियावरही ती तिचे भन्नाट लूक शेअर करत असते. खुशी जिथे दिसेल, तिथे तिच्याभोवती पॅपाराझींचा घोळका जमा होतो. खुशी मुखर्जी अशी अभिनेत्री आहे, जी तिच्या अभिनयामुळे कमी आणि सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंमुळे जास्त चर्चेत असते.
नुकताच खुशी मुखर्जीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिनं मागून फाटलेली जीन्स आणि रिवीलिंग टॉप वेअर केला आहे.
या व्हिडीओमध्ये ती पॅपाराझींशी बोलताना दिसत आहे आणि त्यांना सांगते की, तिनं जेवण ऑर्डर केलंय आणि आता ती जेवायलाच चालली असल्याचं सांगते. दरम्यान, ती हसत आहे आणि पॅप्सकडेही जेवणही मागवतेय. दरम्यान, तिचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटिझन्स खूप नाराजी व्यक्त करत आहेत आणि तिच्यावर अश्लीलता पसरवल्याचा आरोप करत आहेत.
खुशी मुखर्जीचा व्हिडीओ होतोय व्हायरल
खुशी मुखर्जी व्हायरल व्हिडिओमध्ये ब्ल्यू करलच्या फाटलेली जीन्स आणि काळ्या टॉपमध्ये दिसत आहे. खुशीची ही जीन्स मागच्या बाजूला फाटलेली आहे. खुशीचा लूक पाहून नेटकऱ्यांना राग अनावर झाला. त्यांचा राग उफाळून आला. कमेंटमध्ये नेटिझन्स काय म्हणतायत? हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही खुशीचा व्हायरल व्हिडीओ पाहा.
नेटिजन्स काय म्हणाले?
एका युजरनं व्हिडीओ पाहून कमेंट केलीय की, "ये क्या पहनी है क्या मजबूरी है.", तर, दुसऱ्या एका युजरनं लिहिलंय की, "छी छी कैसे कैसे लोग होते हैं..., तर आणखी एका युजरनं रागात लिहिलंय की, "प्लीज एखाद्या वकिलाला हिच्यावर अश्लीलता पसरवत असल्याची केल दाखल करायला सांगा..." तर, आणखी एकानं लिहिलंय की, "हे आपल्या संस्कृतीसाठी अत्यंत लज्जास्पद आहे..."
सिल्वर स्क्रीन्सवर झळकलीय खुशी मुखर्जी
खुशी मुखर्जी एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे. खुशीनं तमिळ फिल्म अंजल थुरईमधून डेब्यू केलेला. ती हार्ट अटॅक आणि जोंगा प्रेमा यांसारख्या फिल्ममध्ये दिसली होती. याव्यतिरिक्त तिनं बालवीर रिटर्न्ससारख्या शोजमध्येही काम केलंय. खुशी एमटीव्हीच्या स्प्लिट्सव्हिला एक्स आणि लव्ह स्कूल सारख्या रिअॅलिटी शोमध्येही दिसली होती. खुशीनं 'मूत्र विसर्जन वर्जित है' या चित्रपटातही काम केलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :