Sonali Bendre : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रेचा (Sonali Bendre)चाहता वर्ग मोठा आहे. 90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक असणारी सोनाली ही तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. सोनालीनं काही दिवसांपूर्वी ओटीटीवर पदार्पण केलं. तिची  ‘द ब्रोकन न्यूज’ ही वेब सीरिज काही दिवसांपूर्वी ओटीटीवर रिलीज झाली. या सीरिजमध्ये सोनालीनं न्यूज अँकरची भूमिका साकारली आहे. या सीरिजच्या प्रमोशसाठी सोनालीनं एका शोमध्ये हजेरी लावली. या शोमध्ये तिनं धक्कादायक वक्तव्य केलं आहे. अंडरवर्ल्डमुळे काम मिळणं बंद झालं होतं, असं वक्तव्य सोनालीनं एका मुलाखतीमध्ये केलं. तिच्या या वक्तव्यानं अनेकांचे लक्ष वेधलं आहे. 


‘द ब्रोकन न्यूज’या सारिजमधून सोनालीनं ओटीटीवर पदार्पण केलं. या सीरिजच्या प्रमोशनसाठी सोनालीनं ‘द रणवीर शो’ या शोमध्ये हजेरी लावली. यावेळी या पॉडकास्टशोमध्ये सोनालीनं सांगितलं की, 1990 मध्ये अंडरवर्ल्डमुळे चित्रपटांमध्ये काम मिळत नव्हते. ती म्हणाली, 'अनेक वेळा असं झालं की मला जी भूमिका साकारायची होती ती दुसऱ्या कलाकाराला देण्यात आली.' असं सोनाली एका मुलाखतीमध्ये म्हणाली. तेव्हा तिचे पती आणि चित्रपट निर्माते गोल्डी बहल यांच्याकडून सोनालीला मदत घ्यावी लागली, असंही तिनं यावेळी सांगितलं. 


पुढे सोनाली म्हणाली, 'जेव्हा मी दिग्दर्शक किंवा सह- अभिनेत्याला फोन करायचे तेव्हा ते म्हणत होते की, आम्ही मजबूर आहोत, याबद्दल काहीही करू शकत नाही'. मला त्यांची मजबुरी समजत होती.' 


सोनालीनं 1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या आग या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यावेळी सोनालीचं वय 19 वर्ष होते.  त्यानंतर  ‘सरफरोश’, ‘दिलजले’ आणि ‘मेजर साब’या हिट चित्रपटांमध्ये सोनालीनं काम केलं. हम साथ साथ है, चल मेरे भाई आणि लज्जा या चित्रपटतील सोनालीच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. मिशन सपने, इंडियाज गॉट टॅलेंट आणि इंडियाज बेस्ट ड्रामे बाज या छोट्या पडद्यावरील शोमधून सोनाली प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. तिनं या कार्यक्रमांचे परीक्षण केले होते. 


हेही वाचा :