Marathi Actress : मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक अभिनेत्री या 2021 मध्ये बोहल्यावर चढल्या. मानसी नाईक(Manasi Naik), सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni), मिताली मयेकर (Mitali Mayekar) आणि  अभिज्ञा भावे (Abhidnya Bhave) या अभिनेत्रींचा 2021 मध्ये लग्न समारंभ पार पडला. जाणून घेऊयात त्यांच्याबद्दल लग्नातील खास लूकबद्दल-


मराठी चित्रपटसृष्टीमधील अप्सरा म्हणजेच सोनाली कुलकर्णीचा लग्न सोहळा 7 मे 2021 रोजी पार पडला. सोनालीने कुणाल बेनोडेकरसोबत लग्नगाठ बांधली. अत्यंत साध्या पद्धतीने सोनालीचा लग्नसोहळा पार पडला. दुबईमधील एका मंदिरात सोनाली आणि कुणालचा विवाह संपन्न झाला.  सोनालीने लग्नसोहळ्यातील फोटो शेअर करून कॅप्शनमध्ये लिहीले होते की, 'आपल्या देशात अशी परिस्थिती असताना आम्ही कुठलंही celebration करूच शकत नाही. तो खर्च वाचवून कोणाला मदत करता यावी या सारखं भाग्य नाही' सोनालीने लग्नसोहळ्यासाठी निळ्या रंगाची साडी, नाकात नथ आणि सोनेरी रंगाचे दागिने असा लूक केला होता. 





अभिनेत्री मिताली मयेकर आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर यांनी 7 जानेवारी 2021 रोजी लग्नगाठ बांधली. विवाह सोहळ्यासाठी मितालीने हिरव्या रंगाची साडी आणि सोनेरी दागिने असा लूक केला होता. 






20 जानेवारी 2021 रोजी अभिनेत्री मानसी नाईकने बॉक्सर  प्रदीप खरेरासोबत लग्नगाठ बांधली.  जोधा अखबर चित्रपटातील ऐश्वर्या रायसारखा मानसीने लग्नासोहळ्यासाठी लूक केला होता. 
 





अभिनेत्री अभिज्ञा भावेने मेहुल पै यांच्यासोबत 6 जानेवारी 2021 मध्ये लग्नगाठ बांधली. लग्नसोहळ्यासाठी अभिज्ञाने रॉयल लूक केला होता.