Sonakshi Sinha Manager : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) हिच्या मॅनेजरला न्यायालयाने फरार घोषित केले आहे. मुरादाबाद न्यायालयाने मॅनेजरसह तिघांना फरार घोषित करत त्यांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. हे प्रकरण 2019 मधील आहे. मुरादाबादमधील एका इव्हेंट कंपनीचे संचालक प्रमोद शर्मा याने सोनाक्षी सिन्हाच्या (Sonakshi Sinha) कंपनी विरोधात कटघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात सोनाक्षी सिन्हाला (Sonakshi Sinha) उच्च न्यायालयाकडून 28 फेब्रुवारीपर्यंत स्टे देण्यात आला होता. 


काय आहे संपूर्ण प्रकरण?


प्रमोद शर्मा यांनी सोनाक्षी सिन्हाची 2019 मॅनेजर मालविका पंजाबी हिच्या संपर्क केला होता. त्याने सोनाक्षी सिन्हा हिला एका इव्हेंटला उपस्थित राहण्यासाठी वेळ मागितला होता. यानंतर धोमिल ठक्कर आणि एडगर्ल सकारिया यांनी प्रमोद शर्माशी व्यवहार केला होता. दोघांमध्ये एक डील करण्यात आली होती. डीलनुसार, पैसेही देण्यात आले होते. मात्र, सोनाक्षी सिन्हा त्या इव्हेंटमध्ये पोहोचलीच नाही. त्यानंतर प्रमोद शर्माने 22 फेब्रुवारी 2019 रोजी कटघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी आरोपी न्यायालयात हजर झालेच नाहीत. त्यानंतर न्यायालयाने आरोपींची संपत्ती जप्त करण्याचा आदेश दिला आहे. 


न्यायालयाने आदेशात देताना काय म्हटलंय?


सोनाक्षी सिन्हा आणि अन्य 5 जणांविरोधात या प्रकरणी 22 फेब्रुवारी 2019 मध्ये फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रमोद शर्मा यांच्याकडून वकिल पी. के. गोस्वामी न्यायालयात काम पाहिले आहे. या प्रकरणात सर्व आरोपी दोषी असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. शिवाय आरोपी मालविका पंजाबी एडगर्श शकारिया आणि धुमिल ठक्कर यांच्याविरोधात कारवाई करत मालमत्ता जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणात अभिषेक सिन्हा विरोधात अजामीनपात्र वारंट जारी करण्यात आले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 28 फेब्रुवारी रोजी होणार आहे. फसवणूकीच्या या प्रकरणात सोनाक्षी सिन्हाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. न्यायालयाकडून या प्रकरणात तिच्यासाठी 28 फेब्रुवारीपर्यंत वेळ देण्यात आली आहे. मात्र, आरोपी न्यायालयात हजर का राहत नाहीत? याबाबतही तिने भाष्य केलेलं नाही. 






इतर महत्वाच्या बातम्या 


Ananya Panday : उर्फी जावेदला अनन्या पांडेकडून तगडं कॉम्पिटिशन, पॅरिस कल्चर वीकमध्ये नवा लूक