Mrunal Thakur Box Office Collection: आपल्या सौंदर्यानं गायाळ करणाऱ्या बॉलिवूड (Bollywood News), टॉलिवूडच्या (Tollywood News) अभिनेत्रींची बात काही औरच... या अभिनेत्री अनेक चाहत्यांच्या गळ्यातील ताईत असतात. अशीच एक अभिनेत्री जिचे चित्रपट तर फारच कमी बजेटचे असतात, पण तिचं सौंदर्य आणि तिच्या अभिनयाचे अनेक चाहते आहेत, जे बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) रिलीज झालेला तिचा कमी बजेटचा सिनेमाही अगदी 100 कोटींच्या पार घेऊन जातात. 

Continues below advertisement

आम्ही सांगत आहोत, सौंदर्याची खाण असलेल्या मृणाल ठाकूरबाबत... मृणाल ठाकूर (Mrunal Thakur) पुन्हा एकदा चर्चेत आलीय, त्यासाठी कारण ठरलंय तिचा बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगणसोबतचा 'सन ऑफ सरदार 2' हा चित्रपट. हा सिनेमा सुमारे 150 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे आणि वर्षातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या चित्रपटांमध्ये या सिनेमाची गणना केली जाते.

मृणाल ठाकूर या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे आणि हाच सिनेमा मृणालच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरू शकतो, असं मानलं जातंय. 

Continues below advertisement

टेलिव्हिजनच्या मालिकेपासून सुरुवात ते ब्लॉकबस्टर मूव्हीपर्यंतचा प्रवास 

तसं पाहायला गेलं तर, मृणालसाठी हा प्रवास फारसा सोपा नव्हता. तिनं 'मुझसे कुछ कहती ये खामोशियां' या टीव्ही मालिकेतून इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं. पण तिला खरी ओळख मिळाली ती, झी टीव्हीवरच्या 'कुमकुम भाग्य' मालिकेतून. त्या मालिकेत तिनं बुलबुल नावाची भूमिका साकारली, ज्याचं प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केलं. त्यानंतर तिनं आपल्या अभिनय कौशल्यावर बारकाईनं काम केलं आणि नंतर तिनं हळूहळू फिल्म इंडस्ट्रीकडे आपली पावलं टाकायला सुरुवात केली.

टीव्ही मालिकेपासून सुरुवात करणारी मृणाल ठाकूर आता चित्रपटांमध्ये स्वतःचं चांगलं नाव कमावू लागली आहे. तिनं कोणत्याही फिल्मी बॅकग्राऊंडशिवाय स्वतःच्या बळावर, मोठं साम्राज्य उभं केलंय. आज ती बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींच्या सर्वात वरच्या स्थानावर आहे. पाहूयात मृणालचे काही ब्लॉकबस्टर सिनेमे...   

सीता रामम

सीता रामम हा तेलुगू चित्रपट मृणालचा पहिला दाक्षिणात्य सिनेमा. या चित्रपटात तिनं सीता आणि राजकुमारी नूरजहाँची दुहेरी भूमिका साकारली होती. चित्रपटातील तिचा अभिनय लोकांना खूपच आवडला. तेव्हाच मृणालनं प्रेक्षकांच्या मनात अभिनेत्री म्हणून घर केलं. सॅकनिल्कच्या मते, फक्त  30 कोटींच्या छोट्या बजेटमध्ये बनवलेल्या या चित्रपटानं जगभरात बॉक्स ऑफिसवर 94.28 कोटी रुपये कमावले. 2022 मध्ये आलेल्या या चित्रपटानं तिला दक्षिणेतही एक मजबूत ओळख मिळवून दिली.

सुपर  30

'सुपर  30' या चित्रपटातून तिनं बॉलीवूड चित्रपटसृष्टीत प्रवेश केला, ज्यामध्ये ती ऋतिक रोशनच्या प्रेयसीच्या भूमिकेत दिसली होती. या चित्रपटात तिची भूमिका लहान असली तरी तिला खूप पसंती मिळाली. या चित्रपटानं जगभरात 146.94 कोटी रुपये कमावले. या चित्रपटातून तिला एक वेगळी ओळख मिळाली. 

हाय नन्ना

हाय नन्ना हा मृणालच्या सर्वोत्तम तेलुगू चित्रपटांपैकी एक, ज्यामध्ये मृणालनं सुपरस्टार साऊथ अभिनेता  नानीसोबत स्क्रिन शेअर केलेली. या चित्रपटात तिनं आई आणि नानीची ऑनस्क्रिन प्रेयसी अशी दोघांचीही भूमिका खूप सुंदरपणे सादर केलेली. या चित्रपटात तिचा साधेपणा प्रेक्षकांना भावला. आता या चित्रपटाच्या जगभरातील कमाईबद्दल बोलायचं झालं तर, सॅकनिल्कच्या मते, या चित्रपटानं एकूण 76.35 कोटींची कमाई केलेली.

असं असलं तरीसुद्धा सध्या मृणालच्या चाहत्यांच्या नजरा तिचा आगामी सिनेमा 'सन ऑफ सरदार 2' वर खिळल्या आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, हा सिनेमा 150 कोटींच्या बजेटमध्ये बनला आहे, त्यामुळे सुपरहिटचा टॅग मिळवण्यासाठी या सिनेमाला कोणत्याही परिस्थितीत त्याच्या बजेटपेक्षा जास्त कमाई करावी लागणार आहे. या चित्रपटात अजय देवगण, मृणाल ठाकूर, रवी किशनसारखे कलाकार दिसणार आहेत. 1 ऑगस्ट 2025 रोजी हा सिनेमा रिलीज केला जाणार आहे.  

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Actress Became Bollywood Queen to Global Icon: सलमान खानशी भांडण, वाटलं आता संपलं करिअर, बॉलिवूडला रामराम करुन हॉलिवूडची धरली वाट; आता 'हिचा' एंजेलिना जोलीसारखा थाट