Priyanka Chopra Journey From Bollywood Queen to Global Icon: बॉलिवूडमध्ये (Bollywood) नशीब आजमावल्यानंतर अनेक स्टार अभिनेत्रींच्या (Actress) मनात हॉलिवूडचे (Hollywood) वारे वाहू लागतात. पण, सर्वांसाठीच ही वाट सोपी नसते, या वाटेवर अडथळे असतात. हे अडथळे पार करुन तिथे पोहोचलं तरीसुद्धा हॉलिवूडसारख्या विशाल महासागरात टिकणं तसं अवघडच असतं. पण, आज आम्ही तुम्हाला ज्या बॉलिवूडच्या सुपरस्टार अभिनेत्रीबाबत सांगत आहोत, ती फक्त हॉलिवूडपर्यंत पोहोचलीच नाही, तर तिनं अख्ख्या हॉलिवूडला आपल्या नावाची दखल घ्यायला भाग पाडलं. आम्ही ज्या अभिनेत्रीबाबत बोलत आहोत, तिनं सर्वात आधी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि ग्लॅमरस अभिनेत्रींच्या यादीत अव्वल स्थान पटकावलं. एककाळ असा होता की, ही बॉलिवूडची सर्वात महागडी अभिनेत्री म्हणून ओळखली जाऊ लागलेली. पण, नंतर घडलेल्या एका घटनेमुळं तिचं अख्खं आयुष्य बदलून गेली आणि आज ती बॉलिवूडसोबतच हॉलिवूडची टॉप अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.   

आम्ही ज्या अभिनेत्रीबाबत सांगत आहोत, तिचं नाव प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra). बॉलिवूडची 'देसी गर्ल'. 2000 मध्ये 'मिस वर्ल्ड'चा किताब जिंकल्यानंतर प्रियांका चोप्रानं बॉलिवूड चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. तिनं 'मुझसे शादी करोगी', 'अंदाज', 'डॉन', 'फॅशन', 'बर्फी', 'सात खून माफ' अशा अनेक उत्तम चित्रपटांमध्ये काम केलं, तिचा अभिनय आणि शैली प्रेक्षकांना खूप आवडली. फॅशन चित्रपटासाठी तिला राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानितही करण्यात आलं. पण, यशाच्या सर्वोच्च शिखरावर असूनही प्रियांकानं हॉलिवूडला जाण्याचा निर्णय का घेतला असता प्रश्न अनेकांना पडतो. याबाबत तिनं स्वतः एका मुलाखतीत बोलताना खुलासा केलेला. 

प्रियांकानं बॉलिवूड का सोडलं?

एक वेळ अशी आली, जेव्हा प्रियांका चोप्राला बॉलिवूडमध्ये कमी चित्रपट मिळू लागले. तिनं स्वतः एका मुलाखतीत सांगितलं होतं की, मला इंडस्ट्रीमध्ये एका कोपऱ्यात ढकललं जात होतं, लोक मला कास्ट करत नव्हते, मी इंडस्ट्रीतल्या राजकारणाला कंटाळले होते आणि मला ब्रेक हवा होता.

दरम्यान, सलमान खानच्या 'भारत' चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून तिची निवड झाली होती, पण शूटिंग सुरू होण्याच्या फक्त 10 दिवस आधी प्रियांकानं चित्रपट करण्यास नकार दिला. तिनं सांगितलेलं की, ती कामाच्या शोधात आणि स्वतःचं नाव कमविण्यासाठी अमेरिकेत गेली होती. दरम्यान, मीडिया रिपोर्ट्समध्ये अशीही चर्चा होती की, तिनं हे तिच्या लग्नासाठी किंवा एखाद्या मोठ्या प्रोजेक्टसाठी केलेलं.

हॉलिवूडमध्ये मिळवला सर्वात मोठा प्रोजेक्ट 

प्रियांका चोप्रानं मुलाखतीत बोलताना सांगितलेलं की, "जेव्हा ती 'सात खून माफ' या चित्रपटाचं चित्रीकरण करत होती, तेव्हा देसी हिट्सच्या अंजली आचार्यनं तिला एका म्युझिक व्हिडीओमध्ये पाहून फोन केला आणि अमेरिकेत म्युझिक करिअर करायला सुचवलं, त्यानंतर प्रियांकानं ही संधी हेरली आणि मनाशी पक्क केलं लगेचच अमेरिकेला निघाली.

तिथे तिनं पिटबुल, विल्यम, जे-झेड सारख्या गायकांसोबत काम केलं, पण तिची संगीत कारकीर्द चांगली झाली नाही. त्यानंतर तिनं पुन्हा अभिनय करण्याचा प्रयत्न केला.

प्रियांकाला अमेरिकन टीव्ही शो 'क्वांटिको' मिळाला आणि तिथून तिचं नशीब बदललं. यानंतर तिनं 'बेवॉच', 'व्हाईट टायगर', 'सिटाडेल' सारख्या चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं आणि हॉलिवूडमध्ये नाव कमावलं.

एंजेलिना जोलीसारख्या भूमिका साकारतेय प्रियांका चोप्रा 

प्रियांका चोप्राचं नाव आज हॉलिवूडमधल्या आघाडीच्या अभिनेत्रींसोबत घेतलं जातं. ज्यापैकी एक नाव म्हणजे, एंजेलिना जोली. एंजेलिना जोलीनं 'सॉल्ट', 'वॉन्टेड', 'टॉम्ब रेडर ' यांसारख्या दमदार भूमिका साकारल्या आहेत. तसंही प्रियांका चोप्रानं आपली मेहनत आणि टॅलेंटनं आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगळी ओळख निर्माण केली आहे. एंजेलिना असो किंवा प्रियांका दोन्ही अभिनेत्रींनी कोणाचाही सपोर्ट नसताना, किंवा डोक्यावर कुणाचाही हात नसताना इंडस्ट्रीत स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण केलं. 

प्रियांका चोप्राच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर, काही दिवसांपूर्वी प्रियांकाची 'हेड्स ऑफ स्टेट' फिल्म प्राईम व्हिडीओवर रिलीज झालेली. ज्यामध्ये यांच्यासोबत हॉलिवूडचे प्रसिद्ध स्टार्स जॉन सीना आणि इदरीस एल्बा दिसलेले. तसेच, आता प्रियांका लवकरच बॉलिवूडमध्ये वापसी करणार आहे. ती एस.एस. राजामौली यांची अपकमिंग फिल्म   SSMB29 मध्ये दिसणार आहे. यामध्ये तिच्यासोबतच महेश बाबू आणि पृथ्वीराज सुकुमारन यांसारखे स्टार्स दिसतील. चाहते आपल्या लाडक्या 'देसी गर्ल'ला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी आतुर झाले आहेत. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Ramayana Star Yash: 1200 कोटींच्या ब्लॉकबस्टर फिल्मचा हिरो, कधीकाळी 300 रुपये घेऊन घरातून पळून आलेला; आता साकारतोय बॉलिवूडच्या सर्वात महागड्या फिल्मचा विलन