Chhaava Box Office Collection Day 17: विक्की कौशल (Vicky Kushal) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) यांच्या 'छावा' (Chhaava Movie) या चित्रपटानं 17 दिवसांत बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली आहे. हा चित्रपट 2025 मधला सर्वात मोठा ओपनर ठरला. 'छावा'मध्ये मराठा साम्राज्याचे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आहे, जे छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले चिरंजीव होते. छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत विक्की कौशल झळकला आहे. तर, महाराणी येसूबाईंची भूमिका रश्मिका मंदानानं साकारली आहे. हा चित्रपट शिवाजी सावंत यांच्या 'छावा' या मराठी कादंबरीचं रूपांतर आहे, ज्याचं दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलं आहे. तर गेल्या आठवड्यात प्रदर्शित झालेले 'सुपरबॉईज ऑफ मालेगाव' आणि 'क्रेझी' हे चित्रपट 'छावा' समोर टिकून राहण्यासाठी संघर्ष करताना दिसले.
विक्की कौशलच्या 'छवा' चित्रपटानं पहिल्या दिवसापासूनच थिएटरमध्ये धुमाकूळ घातला आहे. 31 कोटींची ओपनिंग केलेल्या या चित्रपटाच्या कमाईत 17 व्या दिवशीही फारशी घसरण झाली नाही. रविवारी या चित्रपटानं भरघोस कमाई केली आणि आता या चित्रपटानं देशभरातील बाहुबलीच्या लाईफटाईम कलेक्शन (421 कोटींपेक्षा) पेक्षा जास्त कमाई केली आहे.
'छावा'ची देशभरात 459.50 कोटींची कमाई
Sacnilk च्या रिपोर्टनुसार, या फिल्मनं 17 व्या दिवशी 25 कोटींची कमाई केली आहे. तसेच, 16व्या दिवशी म्हणजेच, शनिवारी 'छावा'चं हे कलेक्शन जवळपास 22 कोटींच्या जवळपास होतं. जे कोणत्याही चित्रपटाच्या तिसऱ्या विकेंडच्या हिशोबानं शानदार आहे. घरगुती बॉक्स ऑफिसवर या फिल्मनं आतापर्यंत जवळपास 459.50 कोटींचं कलेक्शन केलं आहे.
'छावा'नं जगभरात 620 कोटींचा टप्पा ओलांडला
जर आपण जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर, या चित्रपटाची कमाई 600 कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे. या चित्रपटानं 19 दिवसांत जगभरात 594.50 रुपये कमावले आहेत. तर परदेशात शनिवारपर्यंत 75.00 कोटी रुपये जमा झाले आहेत. आता रविवारी, म्हणजे 17 दिवसांत, 'छावा'नं 620 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे.
'सुपरबॉईज ऑफ मालेगाव'ची सुमारे 1.82 कोटींची कमाई
दरम्यान, रीमा कागती दिग्दर्शित 'सुपरबॉईज ऑफ मालेगाव' या चित्रपटाला समीक्षकांकडून चांगली प्रशंसा मिळाली आहे. हा चित्रपट महाराष्ट्रातील मालेगाव शहरातील तरुणांच्या वास्तविक जीवनातील कथेवर आधारित आहे, ज्यांनी त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी संघर्ष करत असताना, विडंबनात्मक चित्रपट बनवून मालेगावमध्ये एक छोटा चित्रपट उद्योग उभारला. दरम्यान, या चित्रपटाला थिएटरमध्ये फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचं दिसत आहे. या चित्रपटानं आतापर्यंत जेमतेम 1.82 कोटी रुपये कमावले आहेत. या चित्रपटानं पहिल्या रविवारी फक्त 0.63 कोटी रुपये कमावले आहेत.
संडेला 'क्रेजी'चं 1.50 कोटींचं कलेक्शन
याव्यतिरिक्त गेल्या विकेंडला गिरीश कोहलींचा 'क्रेजी' चित्रपटही रिलीज करण्यात आला. ज्यामध्ये मुख्य भूमिकेत सोहम शाह, निमिषा सजयन,टीनू आनंद,शिल्पा शुक्ला,उन्नति खुराना यांसारखे कलाकार झळकले आहेत. या फिल्मची कहाणी आहे, डॉक्टर अभिमन्यु सूद (सोहम शाह) यांची, जो एक उत्तम सर्जन आहे. एकदा ते सर्जरी करत होते, ज्यादरम्यान, एका मुलाचा मृत्यू होते. त्यावेळी डॉक्टरांवर मेडिकल नेग्लिजेंसचा आरोप केला जातो. आता कथेची सुरुवात होते ती 5 कोटी रुपयांपासून जी अभिमन्यू ऑपरेशनमध्ये मृत्युमुखी पडलेल्या तरुणाच्या कुटुंबाला न्यायालयाबाहेर सेटलमेंट करण्यासाठी देणार आहे, पण त्या दरम्यान बरंच काही घडतं. चित्रपटाची कथा वेगळी आहे आणि लोकांना ती आवडली आहे. या चित्रपटानं रविवारी 1.50 कोटी रुपये कमावले आहेत. एकूणच त्यानं 3.85 कोटी रुपये कमावले आहेत.