Smriti mandhana Palash muchhal: भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार क्रिकेटपटू स्मृती मानधना ( Smriti Mandhana) आणि बॉलीवूडचा संगीतकार पलाश मुच्छल गेल्या काही महिन्यांपासून आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत होते. स्मृती आणि पलाशचं लग्न मोडलं. दोघांनीही समाज माध्यमांवर पोस्ट करून याबाबत माहिती दिली होती. लग्न मोडल्यानंतर काही दिवसातच स्मृती पुन्हा एकदा मैदानात परतली. आता पलाशनेही स्मृती सोबत लग्न मोडल्यानंतर पुन्हा एकदा कामाला सुरुवात केली आहे. आपल्या करियर बाबत पलाशनी मोठा निर्णय घेतलाय. आणि या निर्णयात त्याला एका मराठमोळ्या अभिनेत्यांनं साथ दिली आहे.
पलाशला मराठमोळ्या अभिनेत्याची साथ
संगीतकार पलाश मूच्छल स्मृती सोबत लग्न मोडल्यानंतर काही काळ प्रसिद्धझोतापासून दूर होता. पण त्यांना आता पुन्हा कामाला सुरुवात केली असून आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. पलाशच्या या सिनेमात मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे मुख्य भूमिका साकारणार आहे. विशेष म्हणजे पलाश या चित्रपटाचा दिग्दर्शक असणार आहे. याबाबत एका चित्रपट समीक्षकाने केलेली पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.
पलाश मूछलच्या या नव्या कोऱ्या प्रोजेक्टसाठी मराठमोळ्या श्रेयस तळपदेने त्याच्याशी हातमिळवणी केल्याचे बोलले जात आहे. सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. पलासच्या पहिल्याच दिग्दर्शनात श्रेयस मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या दोघांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या चित्रपटाचं नाव काय कथानक काय असणार याविषयी अजून कोणतेही माहिती समोर आलेली नाही. पण लवकरच या सिनेमाचं शूट पलाश मूच्छल सुरू करणार आहे असं या पोस्टमध्ये सांगण्यात आलं आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.
नेटकऱ्यांनी केलं पलाशला ट्रोल
श्रेयस तळपदे आणि पलाश मुच्छल यांच्या एकत्रित प्रोजेक्टला नेटकऱ्यांनी चांगलंच ट्रोल केलं आहे.काहींनी फोटो पाहून 'या फोटोतून चीटरला काढून टाका ' असं लिहिलंय . अनेक नेटकऱ्यांनी चित्रपटाला नाव सुचवले आहे. काहींनी लिहिलं ' या चित्रपटाचे नाव 'अ नाइट बिफोर वेडिंग ' असायला पाहिजे. काहींनी म्हटले सनम बेवफा म्हटलंय. एका युजरने लिहिले 'किती लाजिरवाणी गोष्ट आहे .फ्रेम मध्ये दोघेजण आहेत. दोघांनाही त्यांच्या प्रसिद्धीसाठी क्रिकेटचे त्यांच्यावर खूप उपकार आहेत.श्रेयस तळपदे तू माझा आदर गमावला आहेस ' तर काहींनी श्रेयसचा डाऊनफोल सुरू असल्याचं म्हटलंय.
वैयक्तिक आयुष्यात अनेक चढ-उतार
पलाश मुच्छल आणि स्मृती मंधना यांचा नोव्हेंबर 2025 मध्ये लग्न होणार होतं. त्यांच्या लग्नाची भारतभर एकच चर्चा होती. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्मृतिमंदनाला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देणारे ट्विट केलं होतं. लग्नाचे विधी सुरू झाले होते. पण लग्नाच्या आदल्या दिवशी अफवा आणि वादांमुळे लग्न रद्द करण्यात आलं. अनेक मीडिया रिपोर्ट मध्ये पलाशने स्मृतीची फसवणूक केल्याचं म्हटलं गेलं. दोघांनीही अखेर पोस्ट करत नातं संपल्याची घोषणा केली होती. वैयक्तिक आयुष्यातील या खडतर प्रसंगातून दोघेही बाहेर पडत आहेत. अलीकडेच स्मृतीने बंगळुरूमध्ये आयोजित एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. पलाश हा बॉलीवूडमधील एक प्रसिद्ध संगीतकार आणि गायक आहे. भूतनाथ रिटर्न्स या चित्रपटासाठी त्यांनी संगीत दिला आहे याशिवाय इतरही काही गाणी त्याने कंपोज केली आहेत. दिग्दर्शकाच्या भूमिकेत पलाश पहिल्यांदाच दिसणार आहे.