BMC Election 2026 Mumbai Mayor: मुंबई महानगरपालिका महापौरपदाची (BMC Election 2026 Mumbai Mayor) सोडत नव्या चक्राकार पद्धतीने काढली जाणार आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. मुंबई मनपात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी आणि जनरल प्रवर्गातून महापौर निवडला जाणार आहे. जुन्या चक्राकार पद्धतीने सोडत निघाल्यास यावेळी अनुसूचित जमातीचा महापौर बनवण्याची शक्यता असल्याचं काही तज्ज्ञांचं मत आहे.
जुन्या चक्राकार पद्धतीने क्रम पाळला गेल्यास महायुतीला मोठा धक्का बसणार आहे. कारण महायुतीतल्या भाजप आणि शिवसेना या दोघांकडेही अनुसूचित जमाती प्रवर्गातील एकही नगरसेवक नाही. या प्रवर्गातील नगरसेवक केवळ ठाकरेंच्या शिवसेनेत आहेत. 2004 पासून प्रवर्गांचा क्रम पाळला गेला नसल्याने पुन्हा नव्याने चक्राकार पद्धतीने सोडत काढली जाण्याची शक्यता आहे. मात्र नव्या चक्राकार पद्धतीने जरी सोडत निघाली आणि अनुसूचित जमातीच्या उमेदवाराची चिट्ठी निघाली तरी भाजप शिवसेनेला धक्काच असणार आहे. त्यामुळे देवाच्या मनात असेल तर महापौर बनेल या उद्धव ठाकरेंच्या भाष्याला या नियमाची किनार होती का अशी कुजबूज सुरू झाली आहे. (BMC Election Result 2026)
अनुसूचित जमाती प्रवर्गातील नगरसेवक केवळ ठाकरेंच्या शिवसेनेत- (BMC Election 2026 Mumbai Mayor)
प्रभाग 53 आणि प्रभाग 121 हे दोन प्रभाग अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव होते. या दोन मतदारसंघात सर्वपक्षांनी उमेदवार दिले. पण दोन्ही ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचेच उमेदवार विजयी झाले. प्रभाग 53 मधून जितेंद्र वळवी यांनी बाजी मारली, त्यांनी एकनाथ शिंदेंच्या सेनेचे अशोक खांडवेंचा पराभव केला. तर प्रभाग 121 मधून प्रियदर्शनी ठाकरे यांचा विजय झाला. प्रियदर्शनी ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या उदमेवार प्रतिमा खोपडे यांचा पराभव केला.
महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत 22 जानेवारीला- (Maharashtra Municipal Corporation Mayor Reservation)
सर्व 29 महानगरपालिकामधील महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत 22 जानेवारी रोजी काढली जाणार आहे. 22 जानेवारीला सकाळी 11 वाजता सर्व महापालिकांसाठी महापौरपदाची आरक्षण सोडत काढली जाणार आहे. त्यामुळे कोणत्या प्रवर्गाचा महापौर कोणत्या नगरपालिकेमध्ये बसणार हे 22 जानेवारीला निश्चित होईल. नगरविकास विभागाकडून महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत मंत्रालयात काढली जाईल. (Maharashtra Municipal Corporation Mayor Reservation)
मुंबई महापालिकेचा अंतिम निकाल-(BMC Election Result 2026)
भाजप - 89शिवसेना ठाकरे गट - 65शिवसेना - 29काँग्रेस - 24 मनसे - 6 एमआयएम- 8 एनसीपी - 3 एसपी - 2 एनसीपी शप - 1 --------------एकूण- 227
मुंबई मनपा महापौरपद सोडत नव्या चक्राकार पद्धतीने, VIDEO:
संबंधित बातमी:
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?
मुंबई मनपात चकीत करणारं गणित, ठाकरेंकडे दोन हुकूमी एक्के, महापौर आरक्षण सोडतीने धाकधूक वाढवली!
