Who Is Smriti Mandhana Husband To Be Palash Muchhal: भारताची स्टार क्रिकेटर (Indian Cricketer) स्मृती मानधना (Smriti Mandhana)  लवकरच आपली लग्नगाठ बांधणार आहे. बॉलिवूडचा सुप्रसिद्ध संगीतकार पलाश मुच्छलसोबत (Palash Muchhal) स्मृती मानधना लग्न करणार आहे. नुकतीच तिनं सोशल मीडियावर हटके पद्धतीनं एन्गेजमेंट झाल्याची घोषणा केली आणि आपल्या हातातली अंगठी फ्लॉन्ट केली. त्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह (Prime Minister Narendra Modi)  अनेक सेलिब्रिटींनी स्मृतीच्या व्हिडीओवर पोस्ट करुन तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. पण, त्यासोबत स्मृतीच्या होणाऱ्या नवऱ्याबाबत सोशल मीडियावर अनेक चर्चा रंगल्या आहेत. पलाश मुच्छल नेमका आहे कोण? तो काय करतो? त्याचं वय किती? त्याची एकूण संपत्ती किती? स्मृती आणि पलाश यांच्यात जास्त श्रीमंत कोण? (Who Is Richer Between Smriti And Palash?) यांसारख्या अनेक चर्चा रंगल्यात. 

Continues below advertisement

स्मृती मानधना होणारा नवरा पलाश मुच्छल कोण?

स्मृती मानधना 2019 पासून म्युझिक कंपोजर आणि फिल्म मेकर पलाश मुच्छल यांना डेट करतोय. पलाश मुच्छलनं 2014 च्या 'ढिश्कियाऊं' सिनेमातून पदार्पण केलं. त्यांनी भूतनाथ रिटर्न्ससाठी संगीत देखील दिलंय. त्याचं प्रसिद्ध गाणं 'पार्टी तो बनती है' खूप लोकप्रिय आहे. याशिवाय, 'तू ही है आशिकी' हे गाणं देखील चाहत्यांचं आवडतं गाणं आहे. 

पलाश मुच्छलची बहीण बॉलिवूडमधली सुप्रसिद्ध गायिका 

गाणी लिहिण्यासोबतच, पलाश मुच्छल यांनं अभिनयही केला आहे. अभिषेक बच्चन आणि दीपिका पदुकोण अभिनीत आशुतोष गोवारीकर यांच्या 'खेलें हम जी जान से' या चित्रपटात तो झुनकूच्या भूमिकेत दिसला. त्याची बहीण पलक ही देखील बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध गायिका आहे. तिनं सलमान खानच्या 'किक'सह अनेक हिट चित्रपटांना आवाज दिला आहे.

स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यात श्रीमंत कोण? नेटवर्थ किती? 

स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील वयाच्या फरकाबद्दल, पलाशचा जन्म 22 मे 1995 रोजी झाला होता, तर स्मृती मानधना यांचा जन्म 18 जुलै 1996 रोजी झाला होता. यामुळे पलाश स्मृतीपेक्षा एक वर्ष आणि तीन महिनांनी मोठी आहे. मीडिया रिपोर्टनुसार, तिची एकूण संपत्ती 34 कोटी रुपये आहे, तर पलाशची एकूण संपत्ती 20 ते 41 कोटी असल्याचं म्हटलं जातंय, जे त्याच्या गाण्यांमधून आणि मूवी प्रॉजेक्ट्समधून कमावतो.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Smriti Mandhana Announced Her Engagement: समझो हो ही गया... स्मृती मानधनानं गमतीशीर अंदाजात केली इंगेजमेंट कंफर्म, VIDEO पाहिलात?