Chhaava film emotional scene went viral : छावा चित्रपटाची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसचे अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. जगभरात या चित्रपटाने 500 कोटींपेक्षा अधिक रुपये कमवले आहेत. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारलेला असल्यामुळे महाराष्ट्रात या चित्रपटाला उत्स्फूर्त प्रसिसाद मिळत आहे. या चित्रपटाचा शेवट पाहून अनेक सिनेरसिकांचा कंठ दाटून आला आहे. तसे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, सध्या असाच एक व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडीओत छावा चित्रपट पाहताना चिमुकला हमसून-हमसून रडताना दिसतोय. 

छावातील दृश्य पाहून तरुण हमसून रडला

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ नेमका कुठला आहे, याची निश्चित माहिती मिळू शकलेली नाही. मात्र या व्हिडीओची सगळीकडे एकच चर्चा होत आहे. इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे त्याला आतापर्यंत तीन लाखांपेक्षाही अधिक लाईक्स मिळालेले आहेत. या व्हिडीओतील चिमुकला एका मोबाईलसमोर बसलेला दिसतोय. समोर ठेवलेल्या मोबाईलमध्ये छावा चित्रपटातील शेवटचे दृश्य चालू आहे. छत्रपती संभाजी महाराज औरंगजेबाच्या कैदेत असतानाचा तो प्रसंग आहे. हा प्रसंग पाहूनच समोर बसलेल्या चिमुकल्याच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहात आहेत. 

लहानग्याला येत आहे चीड 

सोबतच हा चिमुकला रागात चित्रपट पाहताना दिसतोय. विशेष म्हणजे हा चित्रपट पाहताना त्याने हाताच्या मुठी घट्ट आवळल्या आहेत. छत्रपती संभाजी महाराज कैदेत असल्याचे पाहून त्याला प्रचंड चीड येत आहेत. हा व्हिडीओ पाहून छावा या चित्रपट निर्मात्यांचे भरभरून कौतुक केले जात आहे. छावा चित्रपटातील प्रसंग पाहून एखाद्याचे हृदय भरून येत असेल, तर चित्रपट निर्मात्यांचे कौतुकच करायला हवे, अशी भावना व्यक्त केली जात आहे.

याआधीही व्हिडीओ झाला होता व्हायरल

दरम्यान, याआधीही शोशल मीडियावर असेच काही व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाच्या चित्रिकरणाचा एक व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओत छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका करणारा विकी कौशल रक्ताच्या थारोळ्यात दिसत होता. अर्थात विकी कौशलची तशी वेशभुषा करण्यात आली होती. चित्रिकरणादरम्यान एका व्यक्तीने विकी कौशलला मिठी मारली होती. हाच व्हिडीओ अपलोड करत नेटकऱ्याने एक क्षणासाठी वाटलं की महाराज कैदेतून सुखरूप सुटले, अशी भावना व्यक्त केली होती. हा व्हिडीओदेखील तेव्हा चांगालच व्हायरल झाला होता. 

हेही वाचा :

कोण आहे पश्मिना रोशन जिची एक झलक पाहण्यासाठी तरुणांची धडपड, ऋतिक रोशनशी नेमकं नातं काय?

संस्कृतीची आगळी वेगळी फॅशन पाहून चाहते घायाळ, डायरेक्ट विचारलं लग्न करशील का?

दिसायला हिरोईनपेक्षाही भारी, बड्या क्रिकेटरची ग्लॅमरस बहीण 'आयटम साँग'मध्ये झळकली; बहारदार डान्सची चर्चा!