Gadchiroli News : शारीरिक दृष्ट्या कमकुवत असलेली 23 वर्षीय तरुणी उघड्यावर शौचास गेलेली असताना तिला अमानुष मारहाण केल्याची घटना गडचिरोली लगतच्या शिवनी (Gadchiroli Crime News) गावातून समोर आली आहे. तर या तरुणीला केलेल्या मारहाणीत ती बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सध्या त्या तरुणीवर गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करून तीला नागपूरला हलवण्यात आले आहे. त्या तरुणीवर अत्याचाराचा (Crime News) प्रयत्न झाल्याचाही प्राथमिक अंदाज सध्या व्यक्त केला जात आहे. मात्र या मागील नेमकं कारण वैद्यकीय तपासानंतरच या संदर्भात माहिती स्पष्ट होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
पुढे आलेल्या माहितीनुसार, तरुणी रविवारी रात्रीच्या सुमारास उघड्यावर शौचास गेली होती. मात्र बराच वेळ ती परत न आल्याने घरच्यांनी तिचा शोध घेतला, तर ती बेशुद्ध अवस्थेत आढळली. तिच्या हाताला जखमा असून डोळ्याखाली दगड किंवा विटाने मारहाण केल्याचे व्रण होते. या घटनेची माहिती मिळतात गडचिरोली पोलिसांनी आरोपी शोधण्यासाठी पाच पथके तयार करून वेगवेगळ्या दिशेला रवाना केली आहेत. हल्लेखोर गावातील आहे की बाहेरील याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. मात्र या घटनेने परिसरात सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
हंडाभर पाण्यासाठी महिलांची पायपीट, कर्मचाऱ्यांना महिलांनी धरले धारेवर
वाशिमच्या रिसोड तालुक्यातील मोप येथील महिला पाण्याच्या मागण्यासाठी आक्रमक झाल्याचे पहायला मिळालंय. हंडाभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत असताना पाणीपुरवठा सुरू करण्याच्या मागण्यासाठी आज मोप येथील महिलांनी रिसोडच्या पंचायत समितीवर धडक दिली. यावेळी पंचायत समितीचे बीडीओ (BDO) गैरहजर असल्यामुळे महिला आणखीनच आक्रमक झाल्या. यावेळी महिलांनी आक्रमक पवित्रा घेत कार्यालयातील कर्मचाऱ्यांना धारेवर धरले.
वाशिमच्या रिसोड तालुक्यातील मोप येथे जलजीवन मिशन अंतर्गत मागील तीन वर्षापासून योजनेचे काम सुरू असून, अद्यापही या योजनेचे काम पूर्ण झाले नसल्यामुळे गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. उन्हाळ्याची चाहूल लागताच हंडावर पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे आज मोप येथील महिलांनी निवेदन देण्यासाठी आले असताना रिसोड पंचायत समितीचे बीडिओ हजर नव्हते. त्यामुळे महिला अधिक आक्रमण झाल्या होत्या. यावेळी कर्मचाऱ्यांनी उत्तर दिल्यामुळे महिला अधिक आक्रमक झाल्या होत्या. एका महिन्याच्या आत पाणीपुरवठा पूर्ण न केल्यास आंदोलन करण्यात इशारा यावेळी महिलांनी दिला.
हे ही वाचा