Sitaare Zameen Par Box Office Collection Day 4: आमिर खानचा (Aamir Khan) 'सितारे जमीन पर' (Sitaare Zameen Par) हा चित्रपट 20 जून रोजी प्रदर्शित झाला आणि प्रदर्शित होताच, पहिल्या आठवड्याच्या शेवटी या चित्रपटानं उत्तम कामगिरी केली आहे. सोमवारचा दिवस चित्रपटासाठी सर्वात महत्त्वाचा होता, कारण कालपासून चित्रपटानं वीकडेजमध्ये प्रवेश केलाय. बहुतेक चित्रपट वीकडेजमध्ये वीकेंड एवढी कमाई करू शकत नाहीत. पण, 'सितारे जमीन पर'बाबत मात्र, काहीसं वेगळं होत असल्याचं पाहायला मिळतंय. 'सितारे जमीन पर' मंडे टेस्टमध्ये पास झाला आहे. 

'सितारे जमीन पर'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन

SACNILC नुसार, आमिर खानच्या चित्रपटानं पहिल्या पहिल्या दिवशी 10.7 कोटी रुपये कमावले. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. दुसऱ्या दिवशी 20.2 कोटी रुपये आणि तिसऱ्या दिवशी 27.25 कोटी रुपये कमावून, चित्रपटानं आठवड्याच्या शेवटी 58.15 कोटी रुपये कमावले.

आज चौथ्या दिवशी फिल्मनं 10.15 वाजेपर्यंत 8.27 कोटी रुपयांची कमाई करत एकूण 66.42 कोटी रुपयांची कमाई केली आहे. दरम्यान, हे आकडे अंतिम नाहीत, यामध्ये बदल होऊ शकतात. 

'सितारे जमीन पर'चं बजेट आणि वर्ल्डवाइड कलेक्शन 

'सितारे जमीन पर' फिल्मीबीटनुसार, जवळपास 90 कोटी रुपयांमध्ये बनवण्यात आला आहे. फिल्मनं SACNILC नुसार, दिलेल्या माहितीनुसार, फक्त 3 दिवसांत वर्ल्डवाइड 95.75 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यामध्ये जर सोमवारचं कलेक्शन जोडलं तर कमाई 100 कोटींचा आकडा पार करते.   

'सितारे जमीन पर' नं मोडले अनेक रेकॉर्ड्स 

'छावा', 'जाट', 'सिकंदर', 'स्काई फोर्स' आणि 'हाउसफुल 5'- 'केसरी 2' वगळता 'सितारे जमीन पर'नं या वर्षी रिलीज झालेल्या सर्व फिल्म्सच्या लाईफटाईम कलेक्शनला मागे टाकलं आहे. आता फिल्म लवकरच यापैकी अनेक फिल्म्सचे रेकॉर्ड्स ब्रेक करण्यासाठी पुढे जात आहे. 

दरम्यान, आमिर खान-जिनेलिया देशमुख यांच्या या चित्रपटाला 'तारे जमीन पर'चा आध्यात्मिक सिक्वेल म्हटलं जात आहे. बहुतेक समीक्षकांनी आर.एस. प्रसन्ना यांच्या या चित्रपटाला खूप चांगले रिव्यूव दिले आहेत आणि  पॉजिटिव वर्ड ऑफ माउथमुळे चित्रपटाला फायदा होत आहे. प्रसिद्ध गीतकार आणि बॉलिवूड व्यक्तिमत्व जावेद अख्तर यांनीही त्यांच्या रिव्यूवमध्ये या चित्रपटाला खूप चांगला चित्रपट असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी असंही म्हटलंय की, कोण म्हणतं की, चांगल्या चित्रपटांना प्रेक्षकांमध्ये खरेदीदार नसतात.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Sankarshan Karhade : माझ्याच गावात नाटकाचा प्रयोग नाही, परभणीतील रंगमंदिरांची दुरवस्था मनाला चटका लावणारी; संकर्षण कराडेची पोस्ट व्हायरल