Swapnil Bandodkar new album song : गालावर खळी, राधा ही बावरी अशी उत्तमोत्तम गाणी गायलेल्या गायक स्वप्नील बांदोडकरनं (Swapnil Bandodkar) आता 'सांग प्रिये' या नव्या म्युझिक अल्बमसाठी (Music Album) आवाज दिला आहे. कोमल खिलारे (Komal Khilare) आणि सोहम चांदवडकर (Soham Chandwadkar) ही नवी कोरी जोडी या गाण्यात झळकली असून, सप्तसूर म्युझिकच्या युट्यूब चॅनेलवर प्रेक्षकांना या गाण्याचा आस्वाद घेता येईल. कोमल ही डाॅक्टर तर सोहम हा पायलट असून दोघेही प्रसिद्ध माॅडेल आहेत.
साईनाथ राजाध्यक्ष, बीना राजाध्यक्ष आणि सप्तसूर म्युझिकने या म्युझिक अल्बमची निर्मिती केली आहे. लीना कुलकर्णी यांनी गीतलेखन केलं आहे, तर अमेय मुळे यांनी संगीत रचना, निखील श्रीधर यांनी संगीत निर्मिती केली आहे. आजवर स्वप्नील बांदोडकरनं अनेक हिट गाणी गायलेली आहेत. प्रेमगीत ही स्वप्नीलची खासियत आहे. त्यामुळे स्वप्नील तरुण-तरुणींचा लाडका गायक आहे.
सांग प्रिये हा म्युझिक अल्बमही प्रेमगीतच असल्यानं स्वप्नीलनं अतिशय उत्तमरीत्या हे गाणं गायलं आहे. त्याशिवाय फ्रेश जोडी, उत्तम शब्द आणि संगीत, सुखद दृश्य यांचा मिलाफ या म्युझिक व्हिडिओमध्ये झाला आहे. त्यामुळे स्वप्नील बांदोडकरच्या आवाजातील या म्युझिक व्हिडिओला प्रेक्षकांची दाद मिळेल यात शंका नाही.
महत्वाच्या बातम्या :
- Man Udu Udu Zhala : देशपांडे सरांसमोर येणार कार्तिक-सानिकाच्या लग्नाचं सत्य
- Runway 34 Motion Poster : अजय देवगण आणि बिग बींच्या 'रनवे 34' सिनेमाचे मोशन पोस्टर रिलीज, ईदच्या मुहूर्तावर होणार प्रदर्शित
- Black Panther Director Arrested : गलतीसे मिस्टेक! बँक दरोड्याच्या आरोपाखाली ‘ब्लॅक पँथर’च्या दिग्दर्शकाला आधी अटक, मग सुटकाही! नेमकं काय झालं?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha