Mahavtar Narsimha Movie: महावतार नरसिम्हा हा चित्रपट रिलीज होऊन जवळपास दोन महिने झाले आहे. मात्र, अजूनही हा सिनेमा चर्चेत आहे. प्रेक्षक अजूनही या सिनेमाबाबत सोशल मीडियावर चर्चा करताना पाहायला मिळत आहेत. चित्रपटात नवीन काही नसून शाळेतील इतिहासाच्या पुस्तकातील एक धडा आहे. त्यामुळे प्रेक्षकांची सिनेमा पाहाण्यासाठीची आतुरता वाढलेली पाहायला मिळाली. या चित्रपटाचं  दिग्दर्शन अश्विन कुमार यांनी केली. अश्विन यांनी अगोदर सुद्धा ऍनिमेटेड सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आणले होते. महावतार नरसिम्हा हा चित्रपट नेमका कसा आहे? जाणून घेऊयात.. 

सिनेमाची स्टोरी काय आहे?

या सिनेमाची स्टोरी ही अगदी तीच आहे जी आपण कदाचित लहानपणापासून ऐकत वाचत आलोय. पूर्ण गोष्ट माहिती असताना सुद्धा चित्रपट पाहताना पुढे काय होईल? पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचते.  

कसा आहे सिनेमा? 

एकंदरीत पूर्ण सिनेमा हिट आहे, स्टोरीलाईन , प्रोडक्शन, डिरेक्शन सर्वच एकदम मस्त आहे. हा सिनेमा पूर्णपणे ऍनिमेटेड आहे, हीच या सिनेमाची खासियत आहे. या सिनेमा 3d स्वरुपात प्रेक्षकांना पाहाता येतोय. शिवाय हा चित्रपट लहान मुलांच्या देखील पसंतीस उतरतोय. पहिल्या आठवड्यात महावतार नरसिम्हाने भारतात 43 कोटींची कमाई केली.  वर्ल्डवाईड पाहिलं तर या सिनेमाने 62 कोटींचा गल्ला जमवला होता. यापैकी 38 कोटी हिंदी भाषेतील व्हर्जनने कमावले तर 13 कोटी तेलगू व्हर्जनने कमावले आहेत. तिसऱ्या आठवड्यात या सिनेमाने  17 कोटींचा आकडा गाठला आणि जगभरात 200 कोटींच्या कमाईचा आकडा लवकरच पार करेल. चित्रपटामध्ये वापरलेल्या पार्श्वसंगीतात एक वेगळी जादू आहे, जेव्हा नरसिम्हा त्या असुराचा वध करतात त्यावेळी वापरलेलं बॅकग्राऊंड म्युजिक अगदी अंगाला शहरे आणतं.

 

इतर महत्त्वाच्या बातम्या : 

मुख्य पात्र अर्ध्यावरच मरतं, सस्पेन्स कॅटेगिरीतील 'बाप' आहे सायको सिनेमा; धडकी भरवणारं म्युझिक