Manu Punjabi : 'बिग बॉस 14' चा स्पर्धक मनू पंजाबी (Manu Punjabi) याला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. या अटकेनंतर मनू पंजाबीने जयपूर पोलिसांचे आभार मानले आहेत. रिपोर्टनुसार या व्यक्तीने त्याच्याकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला होता आणि पैसे न दिल्यास पंजाबी रॅपर सिद्धू मुसेवालासारखे (Sidhu Moose Wala) गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली होती.


या व्यक्तीला अटक केल्यानंतर मनूने सोशल मीडियावर जयपूर पोलिसांचे आभार मानले आहेत. त्याने ट्विट केले की, ‘मी अत्यंत आभारी आणि कृतज्ञ आहे.... रिचा तोमर... एसपी रामसिंग जी, आनंद श्रीवास्तव जी आणि जयपूर पोलिसांचे आभार ज्यांनी मला सुरक्षा दिली आणि सिद्धू मुसेवालाचा मारेकरी असलेल्या गुन्हेगाराला पकडले. मला #SidhuMooseWala  मारेकऱ्यांच्या टोळीकडून 10 लाखांच्या खंडणीची मागणी करणारा ईमेल आला होता. हे पैसे न दिल्यास ते मलाही मारून टाकतील, असे म्हटले होते. गेल्या आठवडा तणावपूर्ण होता.’


पाहा पोस्ट :



या धमकीप्रकरणी चित्रकूट पोलिसांनी 31 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे, ज्याने मनू पंजाबीला ईमेल पाठवून 10 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. हा व्यक्ती कुख्यात लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य असल्याचा दावा त्याने केला होता. उत्तर प्रदेशातील बिजनौर परिसरातून या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या अटकेनंतर उपायुक्त रिचा तोमर यांनी तपास सुरू केला आहे.


मनू पंजाबीला ही धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. जयपूर पोलिसांनी या गुन्हेगाराला अटक केल्याचे सांगण्यात येत आहे. वृत्तानुसार, पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, हा व्यक्ती मनू पंजाबीकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करत होता. धमकीच्या ईमेलच्या अटॅचमेंटमध्ये या व्यक्तीने आपण लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य असल्याचे लिहिले होते. तसेच, चार तासांत 10 लाख रुपये द्या, नाहीतर उलटी गिनती सुरू करा, असे लिहिले होते. या ईमेलची माहिती मिळताच पोलिसांनी आयपी अॅड्रेस ट्रॅक करून आणि नंतर मोबाईल फोनद्वारे गुन्हेगाराला पकडले.


संबंधित बातम्या


Sidhu Moose Wala Song: सिद्धू मूसेवालांचे ‘SYL’ गाणे रिलीज, काही वेळातच मिळाले मिलिअन व्ह्यूज!


Sidhu Moose Wala Murder: सिद्धू मुसेवाला हत्येप्रकरणी मनकिरत औलखला क्लीन चिट, पुराव्यांअभावी गायकाची सुटका!