Singer Lucky Ali Criticizes Lyricist Javed Akhtar: एका कार्यक्रमात हिंदू (Hindu) आणि मुस्लिमांबद्दल (Muslims) केलेल्या वक्तव्याबद्दल गायक लकी अली (Lucky Ali) यांनी ज्येष्ठ गीतकार-कवी जावेद अख्तर (Javed Akhtar) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. जावेद अख्तर यांचं वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झालं, त्यानंतर जावेद अख्तर यांच्या वक्तव्यावर दोन्ही बाजूंनी जोरदार चर्चा झाल्या. अशातच सुप्रसिद्ध गायक लकी अली यांनी एका युजरच्या पोस्टवर कमेंट करत जावेद अख्तर यांना चांगलंच फटकारलं आहे. जावेद अख्तर यांचं अनुकरण करू नका, असं आवाहन केलं आहे. लकी अली यांनी असं का म्हटलं आणि जावेद अख्तर यांनी काय वक्तव्य केलेलं हे सविस्तर पाहूयात...
जावेद अख्तर यांचं वक्तव्य लकी अली यांना आवडलं नाही
'ओ सनम...' फेम गायक लकी अली यांनी एका युजरच्या पोस्टवर कमेंट करत जावेद अख्तर यांच्यावर टीका केली आहे. पोस्टमध्ये जावेद अख्तर यांनी हिंदूंना मुस्लिमांसारखं न वागण्याचं आवाहन केलंय. जावेद अख्तर यांच्या टिप्पणीमुळे सोशल मीडिया युजर्समध्ये फूट पडली. काहींनी त्यांच्या स्पष्टवक्तेपणाचं कौतुक केलं, तर काहींनी, ज्यात लकी अली यांचा समावेश आहे, त्यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला.
जावेद अख्तर नेमकं म्हणालेले काय?
जावेद अख्तर यांनी एका कार्यक्रमात 'शोले' सिनेमातील एका प्रतिष्ठित सीनचा उल्लेख केला, जिथे धर्मेंद्र भगवान शिवाच्या पुतळ्यामागून बोलतात आणि हेमा मालिनी मानतात की, ते तिच्याशी बोलत आहेत. या संदर्भात, ते म्हणाले, "आज असा सीन शक्य आहे का? नाही, मी आज लिहिला नसता... 1975 मध्ये (जेव्हा शोले प्रदर्शित झाला) हिंदू नव्हते का? धार्मिक लोक नव्हते का? होते का?" ते पुढे म्हणाले, "खरं तर, मी रेकॉर्डवर आहे, मी हे इथे बोलत नाहीये. राजू हिरानी आणि मी पुण्यातील प्रेक्षकांच्या मोठ्या गटासमोर होतो आणि मी म्हणालो, 'मुस्लिमांसारखे होऊ नका... त्यांना तुमच्यासारखं बनवा... तुम्ही मुस्लिमांसारखे होत आहात..." ही खरंच एक शोकांतिका आहे..."
लकी अली नेमकं काय म्हणाले?
जावेद अख्तर यांनी नेमकं कोणत्या कार्यक्रमात बोलताना हे वक्तव्य केलंय, याचा खुलासा अद्याप झालेला नाही. जावेद अख्तर यांचं हिंदू-मुस्लिम वक्तव्य पोस्ट करणाऱ्या एका युजरच्या ट्वीटवर रिप्लाय देत लकी अली यांनी टीका केली आहे. लकी अली यांनी लिहिलंय की, "जावेद अख्तरसारखं होऊ नका, कधीही खरे नव्हते, नकली आणि घाणेरडे..."
दरम्यान, लकी अली यांच्या टिप्पणीमुळे दोन्ही दिग्गजांचे चाहते आपापसांत भिडले आहेत आणि सोशल मीडियावर जोरदार वाद पाहायला मिळाला. अद्याप जावेद अख्तर यांनी लकी अली यांच्या टीकेवर कोणतंही भाष्य केलेलं नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :