Continues below advertisement

Horoscope Today 23 October 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 23 ऑक्टोबर 2025, आजचा वार गुरूवार आहे. आज भाऊबीज आहे. आजचा हा दिवस ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने खास आहे. हा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

मेष राशीच्या लोकांनो आज व्यापार धंद्यात तुमच्या हरहुन्नरी हुशार व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडेल, मुलांच्या नवीन विचारांचा आदर कराल

Continues below advertisement

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

वृषभ राशीच्या लोकांनो आज नोकरीमध्ये चाकोरीबद्ध कामाचा कंटाळा आल्याने, काम करता करता थोडी मौज मजा करण्याची लहर येईल

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

मिथुन राशीच्या लोकांनो आज घरामध्ये जवळच्या माणसांचे उत्तम सहकार्य मिळेल, आर्थिक स्थिती सुधारेल

कर्क रास (Cancer Horoscope Today)

कर्क राशीच्या लोकांनो आज काहीतरी नवीन करून दाखवा अधिकाराची इच्छा आणि संशोधन वृत्ती यांचा सुंदर मेळ झालेला दिसेल

सिंह रास (Leo Horoscope Today)

सिंह राशीच्या लोकांनो आज थोडा अतिस्पष्टवक्तेपणा टाळायला हवा, नाहीतर लोकांची मने दुखावली जातील

कन्या रास (Virgo Horoscope Today)

कन्या राशीच्या लोकांनो आज सतत काही ना काही करण्यात गुंतून जाल, उत्तम बोलण्याची इच्छा दुसऱ्यावर चटकन पडेल

तूळ रास (Libra Horoscope Today)

तूळ राशीच्या लोकांनो आज घरात आणि घराबाहेर उत्साहाचे आनंदी वातावरण राहील, एखादी मोठी गुंतवणूक करण्यासाठी काळ चांगला

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

वृश्चिक राशीच्या लोकांनो आज जोडीदाराशी तुमची मते जुळणार नाहीत, पण त्याकडे तुम्ही फारसे लक्ष ही देणार नाही.

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

धनु राशीच्या लोकांनो आज उच्च शिक्षणाच्या अभ्यासात जास्त लक्ष घालावे बौद्धिक गोष्टींकडे जास्त ओढा राहील

मकर रास (Capricorn Horoscope Today)

मकर राशीच्या लोकांनो आज एखाद्या गोष्टीचा लाभ मिळेल असे वाटत असताना, योग्य मार्गाचा अवलंब केल्यास फायद्याचे ठरेल

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

कुंभ राशीच्या लोकांनो आज तुम्ही करीत असलेल्या कामाची पावती तुम्हाला मिळेल, प्रकृती मात्र सांभाळायला हवी

मीन रास (Pisces Horoscope Today)

मीन राशीच्या लोकांनो आज महिला थोड्या आक्रमक बनतील, स्वतःची मते बिनधास्त मांडून आपल्या मताशी ठाम राहाल

हेही वाचा>>

November 2025 Lucky Zodiac Signs: पैसा.. मोठ्या पगाराची नोकरी.. गाडी.. नोव्हेंबर महिना 'या' 5 राशींसाठी अत्यंत लकी! पैसा येईल भरभरून, तुमची रास?

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)