Akshay Kumar In Dipretion: बॉलिवूडचा (Bollywood News) खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) कधी गंभीर, तर कधी कॉमेडी भूमिकांनी प्रेक्षकांना खळखळून हसवतो, पण तोच अक्षय सध्या डिप्रेशनमध्ये (Depression) असल्याची माहिती बॉलिवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक (Famous Bollywood Director) प्रियदर्शन (Priyadarshan) यांनी दिली आहे. प्रियदर्शन यांनी हे सांगताच चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सध्या अक्षय आणि प्रियदर्शन एकत्र आगामी तीन सिनेमांचं शुटिंग करत आहे. यावेळी तो डिप्रेशनचा सामना करत आहे, असं प्रियदर्शन यांनी सांगितलं. तसेच, पुढे बोलताना प्रियदर्शन यांनी अक्षयला नेमकं झालंय काय? याचाही खुलासा केला. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत बोलताना दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला.
प्रसिद्ध आणि ज्येष्ठ अभिनेते गोवर्धन असरानी (Veteran Actor Govardhan Asrani) यांच्या निधनानं संपूर्ण सिनेसृष्टीलाच धक्का बसला नाही, तर अक्षय कुमारलाही धक्का बसलाय. अक्षय कुमार नैराश्यात असल्यासारखा वागतोय... असा खुलासा दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी केला आहे. अक्षयला हे सत्य स्वीकारता येत नाही की, असरानी आता या जगात नाहीत. 20 ऑक्टोबर रोजी दिवाळीला, वयाच्या 84 व्या वर्षी असरानी यांनी जगाचा निरोप घेतला. असरानी सध्या अक्षयसोबत 'भूत बांगला' आणि 'हैवान' या दोन नव्या चित्रपटांमध्ये दिसणार होते, हे दोन्ही चित्रपट प्रियदर्शन दिग्दर्शित करत आहेत. नुकत्याच न्यूज18 ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.
दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी मुलाखतीत बोलताना सांगितलं की, "अक्षय कुमारनं मला दोनदा फोन केला. त्यानं सांगितलं की, तो गेल्या 40-45 दिवसांपासून असरानी सरांसोबत दोन चित्रपटांवर काम करतोय आणि त्यांच्या अशा अचानक जाण्यानं नैराश्य आलंय... त्यांनी अक्षयला अनेक सल्ले दिलेत. ते राजपाल (यादव) ला आयुष्यात त्यानं कोणत्या चुका केल्या आहेत आणि त्या कशा पुन्हा करू नयेत हे देखील सांगायचे..."
त्यानंतर प्रियदर्शननं असरानी यांचा सेटवरील वावर कसा होता? याबाबतही खुलासा केला. ते म्हणाले की, "त्यांना पाठदुखीचा त्रास होता... म्हणून आम्ही त्यांना खुर्ची द्यायचो... कॅमेरा सुरू झाल्यानंतरच आम्ही त्यांना उठायला सांगायचो... त्यांनी मला सांगितलेलं की, ते इंदूरला गेले होते आणि परत येताना रस्ता खराब होता. त्यावेळी त्यांना खूप त्रास होत होता, पायही हलवणं अशक्य होतं. तरीही, येऊन त्यांनी काम पूर्ण केलेलं..."