Singer KK Death : प्रसिद्ध गायक केके (Singer KK) उर्फ कृष्ण कुमार कुन्नथ (Krishnakumar Kunnath) यांचे निधन झाले आहे. त्यांना  Voice of Love देखील म्हटलं जातं. कोलकाता येथे एका कॉन्सर्टनंतर त्यांची तब्येत अचानक बिघडली. केके यांना लगेच जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं पण तिथे डॉक्टर्सनं त्यांना मृत घोषित केलं. वायच्या 53 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जाणून घेऊयात त्यांचा जीवनप्रवास...


केके यांचा जन्म दिल्लीमध्ये  जन्म 23 ऑगस्ट 1968 रोजी झाला आहे. दिल्लीतील माउंट मेरी स्कूलमध्ये केके यांनी शिक्षण घेतलं.   इयत्ता दुसरीत असताना त्यांनी आपले पहिले गाणं गायले.  तसेच केके यांनी किरोडी मल कॉलेजमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. ग्रॅज्युएशननंतर केके यांनी मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून नोकरीही केली आणि यादरम्यान त्यांनी 35 हजारांहून अधिक जिंगल्स गाण्यांचा रेकॉर्ड केला. 1999 मध्ये त्यांचा पल नावाचा त्यांचा पहिला अल्बम रिलीज केला. 


प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनी केके यांना बॉलिवूडमध्ये गाण्याची पहिली संधी दिली. 'माचीस' चित्रपटातील गाण्यांमधून गायक केके यांना विशेष लोकप्रियता मिळाली. माचीस चित्रपटामधील छोड आये हम... या चित्रपटातील गाण्यांना खूप प्रसिद्धी मिळाली. 1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हम दिल चुके सनम'  या चित्रपटामधील तड़प तड़प के... या केके यांच्या गाण्याला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.  
 
नऊ भाषांमध्ये केली गाणी रेकॉर्ड 
केके यांनी हिंदीसोबतच नऊ भाषांमधील गाणी रेकॉर्ड केली आहेत. हिंदी चित्रपटांमध्ये केकेनं 200 पेक्षा जास्त गाणी गायली आहेत.  फिल्मफेयर अवार्ड देऊन देखील केके यांनी गौरवण्यात आलं आहे. 


सेलिब्रिटींनी केला शोक व्यक्त


बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार, गायक अरमान मलिक, अभिनेत्री सोनल चौहान आणि मुनमुन दत्तासह अनेक सेलिब्रिटींनी केके यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. केके सर या जगात आता नाहीत, यावर आमचा विश्वासच बसत नाही, असे म्हणत अरमानने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. भारताच्या हिंदी चित्रपटसृष्टीच्या ख्यातनाम गायक-गायकांपैकी केके एक आहेत. त्यांच्या निधनानंतर संगीत क्षेत्रासह विविध क्षेत्रातून हळहळ व्यक्त होताना दिसत आहे.


इतर संबंधित बातम्या