Weekly Horoscope 27 April To 3 May 2026: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, एप्रिलचा (April 2026) शेवटचा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा आठवडा फार महत्त्वाचा असणार आहे. कारण, या आठवड्याच्या दरम्यान अनेक छोटे-मोठे ग्रहदेखील नक्षत्र तसेच, राशी परिवर्तन करणार आहेत. त्यामुळे एप्रिल महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? धनु आणि मकर राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
धनु रास साप्ताहिक राशीभविष्य (Sagittarius Weekly Horoscope)
लव्ह लाईफ (Love Life) - प्रेमाच्या बाबतीत बोलायचं तर नातेसंबंधात थोडी अनिश्चितता जाणवू शकते. कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका. पार्टनरशी स्पष्ट संवाद ठेवा. कुटुंबासोबत वेळ घालवल्यास मन हलके होईल.
करिअर (Career) - करिअरच्या बाबतीत आठवड्याच्या सुरुवातीला नवीन संधी मिळू शकतात. कामात प्रगतीचे संकेत आहेत, पण घाईघाईने निर्णय घेऊ नका. सहकाऱ्यांशी समन्वय ठेवा. नवीन प्रोजेक्ट सुरू करताना योग्य नियोजन आवश्यक आहे.
आर्थिक स्थिती (Wealth) - आर्थिक स्थितीच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, पैशांच्या बाबतीत थोडी सावधगिरी आवश्यक आहे. अनपेक्षित खर्च वाढू शकतात. गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या. उधळपट्टी टाळा.
आरोग्य (Health) - आरोग्य ठीक राहील, पण ताण टाळा. प्रवास करताना काळजी घ्या. नियमित व्यायाम फायदेशीर ठरेल.
मकर रास साप्ताहिक राशीभविष्य (Capricorn Weekly Horoscope)
लव्ह लाईफ (Love Life) - प्रेमाच्या बाबतीत हा आठवडा नातेसंबंधात भावनिक समजूतदारपणा आवश्यक आहे. जुन्या गोष्टींवरून वाद होऊ शकतात, त्यामुळे शांत राहा. कुटुंबातील वातावरण सुधारण्यासाठी पुढाकार घ्या.
करिअर (Career) - या आठवड्यात कामात प्रगती हळूहळू होईल. जुन्या कामांवर लक्ष केंद्रित केल्यास चांगले परिणाम मिळतील. वरिष्ठांचा सल्ला उपयोगी ठरेल. नवीन निर्णय घेताना घाई करू नका.
आर्थिक स्थिती (Wealth) - आर्थिक बाबतीत बोलायचं झाल्यास, या आठवड्यात आर्थिक स्थिती स्थिर राहील. बचत करण्यासाठी हा चांगला काळ आहे. मोठी गुंतवणूक पुढे ढकलणे योग्य ठरेल.
आरोग्य (Health) - आरोग्याच्या बाबतीत या आठवड्यात थकवा आणि मानसिक ताण जाणवू शकतो. वेळेवर झोप आणि आराम घ्या. नियमित दिनचर्या ठेवा.
ही वाचा
