Neha Pendse: मराठी मनोरंजनसृष्टीची लोकप्रिय अभिनेत्री नेहा पेंडसे (Neha Pendse) हिची एक मुलाखत सध्या प्रचंड चर्चेत आहे. या मुलाखतीत तिने तिच्यासोबत घडलेल्या एका धक्कादायक प्रकाराविषयी सांगितलं. मुंबईच्या एका रस्त्यावर एका व्यक्तीने केलेल्या जबरदस्ती विषयी ती बोलली आहे. जॉगिंगला गेलेली असताना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्या व्यक्तीने जबरदस्ती धरलं आणि गाडी पळवू लागला. असं नेहा म्हणाली. अभिनेत्री नेहा पेंडसे ने अलीकडेच तिच्या आयुष्यात घडलेला भयानक प्रकार शेअर केला आहे. या घटनेमुळे तिच्या मनात निर्माण झालेली भीती अजूनही कायम असल्याचे तिने सांगितलं.
काय म्हणाली नेहा पेंडसे ?
'हॉटरफ्लाय'ला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, "मी जेव्हा अंधेरीमध्ये राहत होते, त्यावेळेला लोखंडवाला रोडवर धावायला जायचे. झालं असं की, हिवाळा होता आणि सुर्योदय व्हायला थोडा वेळ होता. सकाळच्या 5.50 वाजता रोडच्या विरुद्ध बाजूने एक माणूस आला. त्याने आधी मला काहितरी दिशा विचारली. ' मला इथे जायचंय, कसं जायचं वगैरे ... ' आधी त्याने हर हळू आवाजात विचारलं. त्यामुळे मला त्या माणसाजवळ जावं लागलं, तो काय म्हणतोय हे ऐकण्यासाठी. तेवढ्या वेळेत त्याने मला पकडलं आणि जोरात गाडी पळवायला लागला. "
ती पुढे म्हणाली 'त्यावेळी माझ्या हातात माझ्या गाडीची चावी होती. त्याच्या आधीचा मोठा रिमोट मी त्याच्या गाडीला मारला. मागच्या काचेवर तो जोरात लागला. त्यामुळे त्या माणसाने ब्रेक मारला. तो माणूस थांबला आणि माझ्या आजूबाजूला कोणीही नाही. त्या एका क्षणात जर त्याने गाडी रिव्हर्स घेतली असती आणि माझ्यासोबत काही केलं असतं तर ... ती भीती प्रचंड भेदरवून टाकणारी होती. त्या माणसाने एका सेकंदात फक्त काच फुटली की नाही एवढं बघितलं आणि तो निघून गेला. मला थोड्यावेळ काहीही सुचत नव्हतं. मला रोज धावताना पाहणारे लोक जमा होऊ लागले. रोज धावणारी ही मुलगी अशी का चालते हे त्यांना कळेना. मी माझ्या गाडीचा रिमोट शोधत होते. मला काहीही सुचत नव्हतं.मी त्या जमलेल्या लोकांना नजरही भिडवू शकत नव्हते. बसा बसा मी माझ्या गाडीचा रिमोट घेतला आणि तिथून पळून गेले. " हा माझ्या आयुष्यातील एक प्रसंग होता असं अभिनेत्री नेहा पेंडसे म्हणाली.
नेहा पेंडसेच्या कामाविषयी..
नेहा पेंडसे ही केवळ अभिनेत्री नाही तर एक लोकप्रिय निर्माती आहे.तिने बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती.तिचा पहिला शो कॅप्टन हाऊस हा एक हॉरर शो होता. त्यावेळी नेहा फक्त दहा वर्षांची होती. त्यानंतर नेहाने हसरतें, पडोसन यासारख्या मालिकांमध्ये काम केले.नटसम्राट, नुकताच प्रदर्शित झालेला आम्ही तिघी या सिनेमातही तिच्या भूमिकेचा कौतुक झालं. टीव्ही मालिका व्यतिरिक्त तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केला आहे. तिचा पहिला चित्रपट 1999 मध्ये प्रदर्शित झालेला 'दाग : द फायर ' होता . त्यानंतर ती प्यार कोई खेल नही सारख्या चित्रपटांमध्ये ही दिसली.
