Sikandar Movie First Review: सलमान खानच्या (Salman Khan) 'सिकंदर' (Sikandar Movie) चित्रपटाच्या ट्रेलरनं (Sikandar Movie Trailer) खळबळ उडवून दिली आहे. भाईजानच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर 19 तासांत 39 म‍िल‍ियन्सहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. अशातच, 'सिकंदर'चे दिग्दर्शक एआर मुरुगादोस यांनी सलमान खानची धमाकेदार एन्ट्री आणि चित्रपटाच्या क्लायमॅक्सबद्दलच्या काही गोष्टींचा उलगडा केला आहे. एकंदरीतच चाहत्यांसाठी 'सिकंदर'चा फर्स्ट रिव्ह्यू त्यांनी दिला आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. 


हर दिल का वो एक दिलावर, जान-ए-जिगर वो है कौन... सिकंदर... चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा मेगास्टार सलमान खान आपली ईदी घेऊन तयार आहे. त्याचा हा चित्रपट ईदच्या निमित्तानं 30 मार्च रोजी प्रदर्शित होत आहे. 'सिकंदर'चा अद्भुत आणि अ‍ॅक्शननं भरलेला ट्रेलर रविवारी, 23 मार्च रोजी प्रदर्शित झाला. या ट्रेलरला फक्त 6 तासांत 20 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत आणि 19 तासांत 39 म‍िल‍ियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. 'सिकंदर'मधल्या गाण्यांनी तर आधीच सर्वांना थिरकायला भाग पाडलं आहे. अशा परिस्थितीत, हा चित्रपट पहिल्या दिवशीच बंपर कमाई करेल याची खात्री आहे. 


साजिद नाडियाडवालाच्या बॅनरखाली बनवलेल्या 'सिकंदर'च्या पटकथेबद्दल आतापर्यंत कोणतीही विशेष माहिती समोर येऊ शकलेली नाही. पण, ट्रेलर पाहिल्यानंतर कथेचं कथानक स्पष्ट झालं आहे. सलमान खानच्या चित्रपटांमध्ये सर्वात धमाकेदार गोष्ट काय असेल तर ती त्याची क्लासी एन्ट्री. भाईजानच्या एन्ट्रीवर थिएटरमध्ये टाळ्यांचा कडकडाट आणि शिट्या ऐकायला मिळतात. यावर दिग्दर्शक एआर मुरुगादोस म्हणाले की, "सिकंदर'मध्ये सलमान खानची एन्ट्री चित्रपटातील सर्वात मोठी हायलाईट असेल. 


'सिकंदर'चा सर्वात मोठा धमाकेदार सीन सलमान खानची एन्ट्री 


पिंकव्हिलाशी बोलताना दिग्दर्शक एआर मुरुगदास म्हणाले की, "मी माझ्या मागील सर्व चित्रपटांमध्ये सुपरस्टार्ससोबत काम केलं आहे आणि सलमान खानसुद्धा सुपरस्टार आहे. 'सिकंदर'मधली त्याची एन्ट्री आणि इंट्रो सीन सर्वात खास असेल. हा सीन चित्रपटातील सर्वात मोठ्या हायलाईट सीन्सपैकी एक आहे. आम्ही नेहमी सर्वात आधी स्क्रीप्ट लिहितो आणि नंतर जेव्हा आम्ही हिरोकडे जातो, त्यावेळी आम्ही त्याच्या फॅन फॉलोइंगच्या हिशोबानं इंट्रो सीन लिहितो. 'सिकंदर'साठी मात्र आम्ही सलमान सरांच्या सुपरस्टारडमची विशेष काळजी घेतली आहे.


इंटरलपूर्वीच धमाकेदार ट्विस्ट, इमोशनल सीन्सनंतर धमाकेदार क्लायमॅक्स 


'सिकंदर'चे दिग्दर्शक म्हणाले की, "फिल्ममध्ये असे अनेक इमोशनल सीन्स आहेत, जे प्रेक्षकांच्या मनावर आणि हृदयावर कायमची छाप सोडतील. असं म्हणता येईल की, ही फिल्म इम्‍पॅक्‍टफुल सीन्‍सनी भरलेली आहे. हिरोची एन्ट्री, इंटरवलपूर्वीचा ट्विस्ट, इंटरवलनंतरचे इमोनल सीन्स आणि शेवटी एक धमाकेदार क्लायमॅक्स, एक कम्प्लीट पॅकेज आहे,'सिकंदर'. या फिल्ममध्ये खूप हाय पॉईंट्स आहेत, जे प्रेक्षकांना वेड लावतील."


'गजनी' सारखंच 'सिकंदर'मध्ये स्पेशल सरप्राईज


यापूर्वी एआर मुरुगादॉस यांनी एका मुलाखतीत बोलताना सांगितलेलं की, 'गजनी'प्रमाणेच 'सिकंदर'मध्ये स्पेशल सरप्राईज असणार आहे. दरम्यान, ट्रेलरला मिळालेल्या जबरदस्त प्रतिसादावरून असं दिसतंय की, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करेल. दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव सलमान खान चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये कमी दिसणार असल्याचीही माहिती समोर येत आहे.


'सिकंदर'च्या स्टारकास्टद्दल बोलायचं झालं तर, या चित्रपटात सलमान खान आणि रश्मिका मंदाना यांच्यासोबत सत्यराज, प्रतीक बब्बर, काजल अग्रवाल, शर्मन जोशी आणि अंजिनी धवन यांच्याही दमदार भूमिका पाहायला मिळणार आहेत. चित्रपटाचं अॅडव्हान्स बुकिंग 25 मार्चपासून सुरू होईल. आता आपल्याला फक्त 30 मार्चची वाट पाहावी लागणार आहे, चाहत्यांचा लाडका भाईजान ईदची ईदी म्हणून त्याच्या धमाकेदार चित्रपटासह मोठ्या पडद्यावर ईद मुबारकच्या शुभेच्छा देण्यासाठी येईल.


पाहा 'सिकंदर'चा शानदार ट्रेलर