Tamim Iqbal suffered two heart attacks : बांगलादेशचा क्रिकेटपटू तमीम इक्बाल याला भर मैदानात ह्रदयविकाराचा झटका आल्यानंतर आता त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. डॉक्टरांची एक टीम त्याच्यावर उपचार करण्यासाठी तैनात करण्यात आली आहे. तमीम इक्बालला ह्रदयविकाराचे दोन झटके आले आहेत. पहिला ह्रदयविकाराचा सौम्य होता. मात्र, ह्रदयविकाराचा दुसरा धक्का तीव्र आला असल्याने चिंता वाढलीये. डॉक्टरांनी त्याला दोन वेळेस शॉक ट्रीटमेंट दिली आहे. याशिवाय त्याला 22 मिनीटे सीपीआर देखील देण्यात आलाय. दरम्यान, अद्याप तो यातून पूर्णपणे सावरलेला नाही. 

डॉ. मोनिरुझ्झमान मारुफ  आणि त्यांच्या टीमकडून तमीमवर उपचार सुरु आहेत. सवारमधील सरकारी रुग्णालयात सध्या उपचार करण्यात येत आहेत. ह्रदयविकार असलेल्या रुग्णांना आधीच  angiograms करावी लागते. एक दिवस अगोदर रुग्णालयात दाखल व्हावे लागते. तमीम करण्यात येणारे उपचार करण्यासाठी वैद्यकीय टीमची मंजुरी मिळेपर्यंत वाट पहावी लागते. याशिवाय होणाऱ्या खर्चाच्या 15-20 पट जास्त पैसे द्यावे लागतात. दरम्यान, डॉक्टरांनी बांगलादेशातील आरोग्य व्यवस्थेवरही भाष्य केलंय. 

ढाका प्रिमिअर लीग सुरु असताना ह्रदयविकाराचा झटका 

ढाका प्रिमिअर डिव्हिजन क्रिकेट लीगमधील सामन्यादरम्यान  दिग्गज खेळाडू आणि बांगलादेशचा माजी कर्णधार तमीम इक्बाल यांला हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. 36 वर्षीय तमीम इक्बाल सध्या मृत्यूशी झुंज देत असून क्रिकेट जगतातील मान्यवर मंडळींकडून तो बरा व्हावा, यासाठी प्रार्थना करण्यात येत आहे. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, तमीम इक्बालला फिल्डिंग करताना अस्वस्थ वाटू लागले होते, त्यानंतर त्याला फजीलाट्यूनेशा  हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, तमिम इक्बालचा वैद्यकीय अहवाल आता समोर आलाय. त्याच्यावर कोणते उपचार करण्यात आले याची माहिती देखील सांगण्यात आली आहे. तमीम इक्बालने छातीत दुखत असल्याची तक्रार करताच त्याला रुग्णालयात नेण्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात आली होती. तमिमने ही तक्रार 50 षटकांच्या सामन्याच्या पहिल्या डावात केली होती, त्यानंतर वैद्यकीय तज्ज्ञ तातडीने पोहोचले.

तमीम इक्बालची कारकीर्द 

बांगलादेशसाठी तमीम इक्बालने 243 वनडे सामने खेळले आहेत. त्यापैकी 78 सामन्यांमध्ये तमीमने बांगलादेशचं नेतृत्व केलंय. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने 38.89 च्या सरासरीने 5134 धावा केल्या आहेत. याशिवाय एकदिवसीय कारकिर्दीत 36.65 च्या सरासरीने 8357 धावा केल्या. तसेच बांगलादेशसाठी T20 फॉरमॅटमध्ये 117.20 च्या स्ट्राईक रेटने आणि 24.08 च्या सरासरीने 1758 धावा केल्या. तमिम इक्बालने एकदिवसीय सामन्यांमध्ये 10 शतके झळकावली आहेत. तर कसोटी क्रिकेटमध्ये 14 शतके आहेत. तर तमीमने टी-20 फॉरमॅटमध्ये एकदाच शतकी खेळी केलीये. 

इतर महत्त्वाच्या बातम्या

IPL DC vs LSG Vipraj Nigam: दिल्लीने 50 लाखांत खरेदी केले, 20 वर्षांच्या पोराने लखनौला रडवले; 15 चेंडूत सामना फिरवणारा विप्राज निगम कोण?