Sikandar Box Office Collection Day 3: सलमान खान (Salman Khan) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) स्टारर 'सिकंदर' (Sikandar) 30 मार्च रोजी मोठ्या अपेक्षांसह थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. पण, हा पॉलिटिकल अॅक्शन ड्रामा बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकला नाही. पहिल्या दिवशी चित्रपटावा चांगली सुरुवात मिळाली खरी, पण त्याचा उपयोग झाला नाही. 'सिकंदर' 2025 चा सर्वात मोठा ओपनर असणाऱ्या 'छावा'चा रेकॉर्ड मोडणार असल्याचं बोललं जात होतं. पण, तसं काहीच झालं नाही. त्यामुळे अजूनही 2025 च्या सर्वात मोठ्या ओपनरचा रेकॉर्ड 'छावा'च्याच नावावर आहे. ईदच्या दुसऱ्या दिवशी 'सिकंदर'च्या कमाईत वाढ झाली, पण ती अपेक्षेनुसार नव्हती. 'सिकंदर'नं रिलीजच्या तिसऱ्या दिवशी किती कोटींचा गल्ला जमवला? जाणून घेऊयात सविस्तर...
'सिकंदर'नं तिसऱ्या दिवशी किती कोटींचा गल्ला केला?
ईदला सलमान खाननं 'सिकंदर' या चित्रपटातून धमाकेदार कमबॅक केलं. सुपरस्टारच्या गेल्यावर्षीच्या ईदला प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या तुलनेत 'सिकंदर'ला प्रेक्षकांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. रविवार आणि ईदला सुट्टीच्या दिवशीही 'सिकंदर'ला बंपर कमाई करता आली नाही. चित्रपट प्रदर्शित होऊन तीन दिवस झालेत आणि तरीदेखील त्यानं 100 कोटी रुपयेही कमावलेले नाहीत. सॅक्निल्कनं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, चित्रपटाच्या कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर,
- 'सिकंदर'नं रिलीजच्या पहिल्या दिवशी 26 कोटी रुपये कमावले होते.
- दुसऱ्या दिवशी चित्रपटाने 11.54 टक्क्यांनी वाढ करून 29 कोटी रुपये कमावले.
- सॅक्निल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'सिकंदर'नं तिसऱ्या दिवशी 19.5 कोटी रुपये कमावले आहेत.
- यासह, 'सिकंदर'ची तीन दिवसांत एकूण कमाई आता 74.5 कोटी रुपये झाली आहे.
तीन दिवसांनंतरही 'सिकंदर'नं अर्धंही बजेट वसूल केलेलं नाही
'सिकंदर' अपेक्षा पूर्ण करू शकला नाही. चित्रपट प्रदर्शित होऊन तीन दिवस झालेत आणि 'सिकंदर' त्याचं अर्धंही बजेट वसूल करू शकलेला नाही. हा चित्रपट 200 कोटी रुपये खर्चून बनवण्यात आला आहे. सध्या, चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कामगिरीकडे पाहता, तो बॉक्स ऑफिसवर हिट होण्याची आशा आता संपली आहे.
दरम्यान, 'सिकंदर' चं दिग्दर्शन ए.आर. मुरुगदोस यांनी केले असून साजिद नाडियादवाला निर्मित आहेत. चित्रपटाच्या स्टारकास्टबद्दल बोलायचे झाले तर, सलमान खान व्यतिरिक्त रश्मिका मंदान्ना, सुनील शेट्टी, शर्माना जोशी, काजल अग्रवाल, प्रतीक बब्बर आणि सत्यराज यांनी 'सिकंदर'मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :