Horoscope Today 02 April 2025: पंचांगानुसार, आज 02 एप्रिल 2025, म्हणजेच आजचा वार बुधवार. आज एप्रिल महिन्याचा दुसरा खास दिवस आहे. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.


मेष रास (Aries Horoscope Today)


मेष राशीच्या लोकांनो आज सुख मानून घ्यावे लागेल, आलेली संधी आणि त्यापासून मिळणारा फायदा हा थोडा मनाविरुद्ध असू शकतो


वृषभ रास (Taurus Horoscope Today)


वृषभ राशीच्या लोकांनो आज नोकरी व्यवसायात अडचणी आल्या, तरी त्या दूर होतील, हाताखालच्या लोकांचे सहकार्य मिळण्यासाठी त्यांना मसका लावाल.


मिथुन रास (Gemini Horoscope Today)


मिथुन राशीच्या लोकांनो आज आर्थिक मान चांगले राहील, जुनी येणी वसूल होतील रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी वेळेवर औषधोपचार घ्यावेत


कर्क रास (Cancer Horoscope Today)


कर्क राशीच्या लोकांनो आज काम करताना आत्मविश्वासाचा अभाव आणि मानसिक अस्वास्थ्य जाणवेल 


सिंह रास (Leo Horoscope Today)


सिंह राशीच्या लोकांनो आज मनाच्या शांतीसाठी ओंकार आणि प्राणायाम याचा उपयोग जरूर करा, महिलांना त्यांच्या मताशी तडजोड करणे भाग पडेल 


कन्या रास (Virgo Horoscope Today)


कन्या राशीच्या लोकांनो आज जीवनाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन आनंदी राहील, भाग्याची साथ मिळेल 


तूळ रास (Libra Horoscope Today)


तूळ राशीच्या लोकांनो आज संततीच्या तब्येतीची काळजी घ्यावी, संततीसाठी पैसा खर्च करावा लागेल 


वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)


वृश्चिक राशीच्या लोकांनो आज कोणत्याही नवीन योजना अमलात आणायची घाई करू नका, नोकरी धंद्याच्या ठिकाणी अचानक काम मिळणे अथवा जाणे दोन्ही शक्यता आहेत 


धनु रास (Sagittarius Horoscope Today)


धनु राशीच्या लोकांनो आज भावंडांशी थोडे मतभेद संभवतात, लांबच्या प्रवासाचे योग येतील


मकर रास (Capricorn Horoscope Today)


मकर राशीच्या लोकांनो आज केलेले प्रवास फायदेशीर ठरतील, महिलांनी आपल्या दृष्टिकोन बदलायला हवा


कुंभ रास (Aquarius Horoscope Today)


कुंभ राशीच्या लोकांनो आज प्रतिकूल परिस्थितीतूनही तुमच्या पराक्रमाला ऊर्जा देणारा दिवस आहे, पुढील महत्त्वाच्या कामाचे नियोजन करा


मीन रास (Pisces Horoscope Today)


मीन राशीच्या लोकांनो आज नोकरी धंद्यात बरोबरचे लोक पुढे जात आहेत, याचा अनुभव आल्यामुळे चिडचिड होऊ शकते


डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)


संपर्क - 9823322117    


हेही वाचा>>


Shani Surya yuti 2025: 2 एप्रिल तारीख ठरणार गेमचेंजर! 'या' 3 राशींच्या उत्पन्नात होणार प्रचंड वाढ, सूर्य-शनि जबरदस्त योग बनवणार


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)