Sikandar Box Office Collection Day 3: बॉलिवूड (Bollywood) भाईजान सलमान खानचा (Salman Khan) 'सिकंदर' (Sikandar Movie) नुकताच थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. अशातच या फिल्मला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. रिलीजपूर्वी 'सिकंदर' सर्वांना मागे टाकेल असं वाटलं होतं. पण, तसं काहीच झालं नाही. प्रमोशनवेळी बोलताना सलमान खाननं चित्रपट 200 कोटींची ओपनिंग करेल, असा विश्वास व्यक्त केलेला, पण तसं झालंच नाही. समीक्षकांनी चित्रपटाला वाईट प्रतिसाद दिला आहे. हा चित्रपट ए.आर. मुर्गाडोस यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात रश्मिका मंदाना, शर्मन जोशी, काजल अग्रवाल आणि सत्यराज देखील दिसले आहेत. हा चित्रपट 30 मार्च रोजी प्रदर्शित झाला. जाणून घेऊयात, चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबाबत सविस्तर...

'सिकंदर' चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन                 

सॅक्निल्कच्या अहवालानुसार, 'सिकंदर'नं तिसऱ्या दिवशी रात्री 10 वाजेपर्यंत 14.58 कोटी रुपये कमावले आहेत. चित्रपटानं 15 ते 18 कोटी रुपये कमावले असल्याचं समोर आलं आहे. तर, तिसऱ्या दिवसाच्या कलेक्शनचे अधिकृत आकडे अद्याप जाहीर झालेले नाहीत. रिलीजच्या तिसऱ्या दिवसाच्या मध्यापर्यंत चित्रपटाचं एकूण कलेक्शन 69.58 कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. या चित्रपटानं पहिल्या दिवशी 26 कोटी रुपये कमावले आहेत. ईदच्या दुसऱ्या दिवशी चित्रपटानं 29 कोटी रुपये कमावले. ईदनंतर चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली.                          

भाईजानकडून चाहत्यांना स्पेशल ईदी 

सलमान खान सध्या चर्चेत आहे. त्यानं चाहत्यांना ईदच्या शुभेच्छाही दिल्या. सलमान खाननं बुलेटप्रुफ बाल्कनीतून चाहत्यांचं स्वागत केलं. त्याच्या बाल्कनीत बुलेटप्रूफ काच बसवण्यात आली होती. यावेळी त्याची भाचीही त्याच्यासोबत होती. सलमान खानच्या ईद सेलिब्रेशनचे व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहेत. 

सलमान खानच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर, सलमान खान शेवटचा बेबी जॉन चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात त्यानं एक छोटीशी भूमिका केली होती. सलमान खानचा कॅमिओ चाहत्यांना आवडलेला. त्याच वेळी, तो शेवटचा 'टायगर 3' मध्ये दिसला होता. त्यानं 'किसी का भाई किसी की जान', 'पठाण', 'अंतीम', 'राधे', 'कागज'.  'दबंग 3'  सारखे चित्रपट केले आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Story Behind Bollywood Movie: कलम हसन यांचा 'तो' चित्रपट, जो पाहिल्यानंतर प्रेमीयुगुलं संपवू लागलेली आयुष्य; संपूर्ण देशात माजलेली खळबळ