Story Behind Bollywood Movie: कलम हसन यांचा 'तो' चित्रपट, जो पाहिल्यानंतर प्रेमीयुगुलं संपवू लागलेली आयुष्य; संपूर्ण देशात माजलेली खळबळ
Story Behind Bollywood Movie: सिनेमा हा समाजाचं प्रतिबिंब असतो, असं आपण अनेकदा ऐकतो. कधीकधी एखादा चित्रपट लोकांच्या हृदयावर आणि मनावर खोलवर परिणाम करतो.
Continues below advertisement
Story Behind Bollywood Movie
Continues below advertisement
1/11
1981 मध्ये अशीच एक लव्ह ड्रामा फिल्म आलेली, जिच्या कहाणीमुळे लोकांच्या हृदयावर आणि मनावर खोलवर परिणाम झाला. या फिल्मनं प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं होतं. क्लायमॅक्स पाहून अनेक रिलेशनशिपमध्ये असलेल्या जोडप्यांनी आत्महत्या करायला सुरुवात केली.
2/11
दाक्षिणात्य सिनेसृष्टी आणि त्यासोबतच बॉलिवूड गाजवणाऱ्या कमल हसन यांचा पहिला चित्रपट होता. पण, या चित्रपटानं संपूर्ण देशभरात खळबळ माजवली होती.
3/11
खरंतर, आपण 5 जून 1981 रोजी प्रदर्शित झालेल्या 'एक दुजे के लिए' या लव्ह ड्रामा चित्रपटाबद्दल बोलत आहोत. या फिल्ममध्ये कमल हासन आणि रति अग्निहोत्री यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या.
4/11
के. बालचंदर दिग्दर्शित 'एक दुजे के लिए' हा चित्रपट त्यांचाच तेलुगू चित्रपट 'मारो चरित्र' (1978) चा हिंदी रिमेक होता आणि यामध्ये रती अग्निहोत्रीनं कमलसोबत तिच्या अभिनयानं लोकांची मनं जिंकली होती.
5/11
दरम्यान, 'एक दूजे के लिए'पासून मेकर्सना फारशी अपेक्षा नव्हती. मेकर्सना आधीच धाकधूक होती की, फिल्म फ्लॉप होणार. फिल्मला डिस्ट्रिब्यूटर्सही मिळत नव्हते. त्यानंतर प्रोड्यूसर्सनी याचं डिस्ट्रीब्युशन केलं होतं.
Continues below advertisement
6/11
पण, ज्यावेळी फिल्म रिलीज झाली, त्यानंतरच चित्र फारच वेगळं होतं. 'एक दूजे के लिए'चे शो हाऊसफुल्ल होऊ लागले. फिल्मची अद्भुत प्रेमकथा, विशेषतः क्लायमॅक्सनं प्रेक्षकांच्या मनावर खोलवर छाप सोडली. हा चित्रपट थिएटरमध्ये पाहिल्यानंतर लोकांना अश्रू अनावर झालेले.
7/11
'एक दूजे के लिए' चं कथानक वासू (कमल हसन) आणि सपना (रति)च्या अवती-भवती फिरते, जे वेगवेगळ्या धर्मांच्या कुटुंबातील असतात आणि एकमेकांच्या प्रेमात पडतात. पण, आपल्या प्रेमासाठी ते कुटुंबाशी फारकत घेतात. अनेक अडचणींचा सामना करतात. पण, या फिल्मला हॅप्पी एन्डिग नाही. आपल्या प्रेमासाठी जगाशी लढताना अखेर वासू आणि सपना एका टेकडीवरुन उडी घेऊन जीव देतात, अशा भयावह आणि दुःखद वळणावर फिल्म संपते.
8/11
'एक दुजे के लिए' च्या प्रचंड यशानंतर लगेचच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. खरं तर, चित्रपट पाहिल्यानंतर अनेक जोडप्यांनी आत्महत्या केली आहे. चित्रपटात वासू आणि सपनाच्या दुःखद अंताचा खऱ्या आयुष्यातील जोडप्यावर परिणाम झाल्याच्या अनेक घटना त्यावेळी समोर आल्या होत्या. त्यामुळे प्रेमी युगुलांच्या आत्महत्यांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली.
9/11
लल्लनटॉपच्या अहवालानुसार, अनेक सरकारी संस्थांनी निर्मात्यांशी संपर्क साधला आणि आत्महत्येविरुद्ध जागरूकता पसरविण्यासाठी त्यांची मदत घेण्यासाठी अनेक बैठका घेतल्या. 16 वर्षीय अभिनेत्री रति वगळता सर्व कलाकार आणि क्रू मेंबर्स या बैठकांना उपस्थित होते. अभिनेत्रीचे वडील तिला नकारात्मक वादांपासून दूर ठेवत असत.
10/11
पोर्टलच्या अहवालानुसार, आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ झाल्यानंतर, के. बालचंदर यांनी चित्रपटाची दुसरी आवृत्ती आनंदी शेवटासह प्रदर्शित केली. पण, लोकांच्या मागणीमुळे, बालचंदर यांना मूळ शेवट कायम ठेवावा लागला.
11/11
'एक दुजे के लिए' चित्रपटाच्या थिएटरमध्ये प्रदर्शनापूर्वी, दिग्दर्शकानं हा चित्रपट त्यांचे आदर्श राज कपूर यांना दाखवला. महान अभिनेते-दिग्दर्शक राज कपूर यांनी चित्रपटांचं कौतूक केलं, पण त्यालाही त्याच्या शेवटाबद्दल आनंद नव्हता. असं म्हटलं जातं की, बालचंदर यांना हॅप्पी एंडिंग सुचवणारे राज कपूर हे पहिले व्यक्ती होते. माधवी, रझा मुराद आणि राकेश बेदी यांनी 'एक दुजे के लिए'मध्ये सहाय्यक भूमिका केल्या होत्या.
Published at : 01 Apr 2025 12:36 PM (IST)