Sikandar Box Office Collection Day 11: सलमान खानचा (Salman Khan) 'सिकंदर' (Sikandar) हा चित्रपट 30 मार्च रोजी जगभरात प्रदर्शित झाला. प्रेक्षक आणि निर्मात्यांना या चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या, पण प्रदर्शित झाल्यानंतर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) चांगली कामगिरी करू शकला नाही. 11 दिवसांनंतरही 'सिकंदर'ला देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर (Box Office) आपलं बजेट वसूल करता आलेलं नाही. आता सनी देओलचा 'जाट' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. पण, त्यापूर्वीच 'सिकंदर'नं बॉक्स ऑफिसवर मान टाकल्याचं पाहायला मिळत आहे.  रिलीजनंतर फक्त अकराव्या दिवशी 'सिकंदर'च्या कमाईत मोठी घट पाहायला मिळत आहे. 


सॅक्निल्कच्या अहवालानुसार, 'सिकंदर'नं पहिल्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर 97.55 कोटी रुपये कमावले. आठव्या दिवशी या चित्रपटानं 4.75 कोटी रुपये कमावले. 'सिकंदर'नं नवव्या दिवशी 1.75 कोटी आणि दहाव्या दिवशी 1.5 कोटी रुपयांचा व्यवसाय केला.                      


'सिकंदर'नं अकराव्या दिवशी किती कमावले? 


'सिकंदर'च्या अकराव्या दिवसाच्या कमाईचे सुरुवातीचे आकडे समोर आले आहेत. 'सिकंदर'नं अकराव्या दिवशी आतापर्यंतचं सर्वात कमी कलेक्शन केलं आहे. सलमान खानच्या फिल्मनं अकराव्या दिवशी रात्री अकरा वाजेपर्यंत फक्त 1.35 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यासोबतच घरगुती बॉक्स ऑफिसवर फिल्मचं टोटल कलेक्शन 107.10 कोटी रुपये झालं आहे.                              






'जाट'ची चाहुल लागताच घाबरला 'सिकंदर'?


10 एप्रिलला सनी देओलची अॅक्शन-थ्रिलर फिल्म 'जाट' थिएटरमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज आहे. फिल्मबाबत प्रेक्षकांमध्ये जबरदस्त क्रेझ पाहायला मिळत आहे. फिल्म रिलीज होण्यासाठी आता एकच दिवस शिल्लक आहे आणि त्यापूर्वीच सलमान खानच्या 'सिकंदर'नं बॉक्स ऑफिसवरचा गाशा गुंडाळला की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 


एआर मुर्गदास दिग्दर्शित 'सिकंदर' एक अॅक्शन-थ्रीलर फिल्म आहे. फिल्ममध्ये सलमान खानसोबत रश्मिका मंदानासुद्धा मुख्य भूमिकेत दिसून आली आहे. याव्यतिरिक्त सत्यराज, प्रतीक बब्बर, काजल आणि शरमन जोशी यांसारखी तगडी स्टारकास्ट 'सिकंदर'मध्ये झळकली आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Sachin Pilgaonkar Gave Befitting Reply: 'मी स्वतःला 'महागुरू' समजतच नाही, मी स्वतःला...'; ट्रोल करणाऱ्यांना पहिल्यांदाच सचिन पिळगांवकरांचं थेट उत्तर