Sachin Pilgaonkar Gave Befitting Reply: मराठी सिनेसृष्टीसोबतच (Marathi Film Industry) बॉलिवूडही (Bollywood) गाजवणारं मराठमोळं नाव म्हणजे, सचिन पिळगांवकर. 90 च्या दशकाचा काळ गाजवणाऱ्या अभिनेत्यांमध्ये सचिन पिळगांवकर (Sachin Pilgaonkar) यांचं नाव आवर्जुन घेतलं जातं. 'नदिया पार', 'सत्ते पे सत्ता' यांसारख्या गाजलेल्या बॉलिवूड चित्रपटांसोबतच (Bollywood Movie) 'अशी ही बनवा बनवी', 'नवरी मिळे नवऱ्याला', 'नवरा माझा नवसाचा' यांसारख्या मराठी चित्रपटांमधूनही सचिन पिळगांवकरांनी आपल्या अभिनयाची जादू दाखवली. त्यासोबतच त्यांनी अनेक रिअॅलिटी शो (Reality Show) केले. त्यापैकी सर्वात गाजलेला शो म्हणजे, 'एका पेक्षा एक'. या डान्स शोमुळे सचिन पिळगावकरांना नवी ओळखही मिळाली. ती ओळख म्हणजे, 'महागुरू' (Mahaguru). 

Continues below advertisement

'एका पेक्षा एक' डान्स रिॲलिटी शोमध्ये सचिन पिळगांवकर मुख्य परीक्षक असल्यानं त्यांना 'महागुरू' नावानं संबोधलं जायचं. पण पुढे अख्खी इंडस्ट्रीच त्यांना महागुरू म्हणून ओळखू लागली. पण नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना सचिन पिळगांवकरांनी त्यांना मिळालेल्या 'महागुरू' या उपाधीबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे. मुलाखतीत सचिन पिळगांवकरांना महागुरू ही उपाधी त्यांनी स्वतःहून लावून घेतली आहे का? असं विचारण्यात आलं. त्यावर सचिन पिळगांवकर म्हणाले की, "महागुरू या नावाला तुम्ही पदवी म्हणा किंवा मग आणखी काही, ते मी स्वतः घेतलेलं नाही. ते मला झी वाहिनीनं दिलेलं आहे."

सचिन पिळगांवकर पुढे बोलताना म्हणाले की, "मी स्वतःला महागुरू समजतच नाही किंवा मानतही नाही. मी स्वतःला जर काही समजत असेल तर कुटुंबप्रमुख. मला वाहिनीच्या लोकांनी पटवून दिलं की, आपण ते नाव का वापरायला हवं? तेव्हा या कार्यक्रमात त्या मुलांचे गुरु सुद्धा असणार होते, जे त्यांना डान्स शिकवणार होते. ते गुरू होते, म्हणूनच त्यांच्यावर मी म्हणून मला महागुरू म्हटलं गेलं. पण मी स्वतःला कधीही महागुरू म्हटलं नाही. मी नेहमी स्वतःचा कुटुंब प्रमुख म्हणून उल्लेख करत असे."

Continues below advertisement

तुम्ही आमच्याकडे अभिनेता म्हणून काम करा, असं मला कोणी सांगतही नाही : सचिन पिळगांवकर 

काही दिवसांपूर्वी आणखी एका मुलाखतीत बोलताना सचिन पिळगांवकर यांनी सध्या काम मिळत नसल्याची खंत व्यक्त केली होती. मुक्काम पोस्ट देवाचं घर या चित्रपटाच्या ट्रेलर सचिन पाळगांवकर यांच्या हस्ते लॉन्च करण्यात आले होते. यावेळी त्यांनी लोकमत फिल्मीला मुलाखत दिली होती. याच मुलाखतीत त्यांनी अभिनय करण्यासाठी काम मिळत नसल्याची खंत व्यक्त केली होती. त्यांचा आगामी चित्रपट कोणता आहे, ते कोणत्या चित्रपटात दिसणार आहेत? असे त्यांना विचारण्यात आले होते. त्यावर बोलताना "सध्यातरी आता मी पडद्यावर येणार नाही. कारण सध्यातरी तसं काही नाहीये. मला कोणी अभिनेता म्हणून घेतही नाहीये. माझ्याकडे कोणी येतही नाही. तुम्ही आमच्याकडे अभिनेता म्हणून काम करा, असं मला कोणी सांगतही नाही. का येत नाहीत, हे मला माहिती नाही. मी अभिनय सोडला आहे, असं कदाचित त्यांना वाटत असेल. पण तसं नाहीये. ती चुकीची समजूत आहे, गैरसमज आहे," अशी खंत सचिन पिळगांवकर यांनी व्यक्त केली होती.