Sidharth Malhotra Birthday Special : बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राचा (Sidharth Malhotra)आज वाढदिवस. आपल्या बहारदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर भुरळ पाडणाऱ्या सिद्धार्थने बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. दमदार अॅक्टींग आणि अपार मेहनतीच्या जोरावर तो यशस्वी करिअरच्या टप्प्यावर आज उभा आहे. रिपोर्ट्सनुसार, सिद्धार्थची वार्षिक संपत्ती 6 कोटी आहे. तर महिन्याला तो 50 ते 60 लाख रूपये कमावतो. पण, चित्रपटांत अभिनय करण्याआधी सिद्धार्थ नेमकं काय काम करत होता हे तुम्हाला माहित आहे का? आज सिद्धार्थच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या जीवनाचे काही अनोखे किस्से जाणून घ्या.
वैयक्तिक खर्च काढण्यासाठी करत होता मॉडेलिंग :
सिद्धार्थ मल्होत्रा मूळचा दिल्लीचा आहे. त्याचे शिक्षणही दिल्लीतच झाले आहे. बारावीनंतर सिद्धार्थने दिल्ली युनिव्हर्सिटीच्या शहीद भगत सिंह कॉलेजमध्ये बीकॉम केले. यानंतर त्याने मॉडेलिंग क्षेत्रात पदार्पण केले. सुरुवातीला वैयक्तिक खर्च काढण्यासाठी सिद्धार्थने मॉडेलिंगमध्ये सुरु केलेले करिअरमध्ये त्याने बराच काळ मॉडेल म्हणून काम केलं आहे.
सहकलाकारसुद्धा होता सिद्धार्थ मल्होत्रा :
सिद्धार्थ मल्होत्राने बॉलिवूडमध्ये अनेक चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. या अभिनयानेच तो करिअरच्या यशस्वी टप्प्यावर आहे. पण, चित्रपटात अभिनय करण्याआधी सिद्धार्थ मल्होत्राने ट्रेनी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले आहे. 2010 साली शाहरूखच्या 'माय नेम इज खान' चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्राने करण जोहरबरोबर सह दिग्दर्शकचे काम केले आहे.
सिद्धार्थने नाकारले हे चित्रपट :
करिअरच्या सुरुवातीला सिद्धार्थने अनुभव सिन्हाच्या चित्रपटासाठी ऑडिशन दिली होती परंतु हा चित्रपट काही कारणास्तव पूर्ण होऊ शकला नाही. 2008 साली आलेल्या 'फॅशन' चित्रपटात मधुर भंडारकर यांनी सिद्धार्थला प्रियंकाच्या अपोझिट मुख्य भूमिकेची ऑफर दिली होती. परंतु, त्यावेळी मॉडेलिंगमध्ये बिझी असलेल्या सिद्धार्थने या चित्रपटास नकार दिला.
असा मिळाला चित्रपटात ब्रेक
ज्यावेळी सिद्धार्थ 'माय नेम इज खान' चित्रपटासाठी सह दिग्दर्शकाचे काम करत होता. त्यावेळी त्याला अभिनयात करिअर करायचे आहे हे सगळ्यांना माहित होते. त्याच दरम्यान धर्मा प्रोडक्शनचा आगामी चित्रपट 'स्टूडंट ऑफ द इयर' साठी लोकांनी सिद्धार्थला ऑडिशन देण्यास सांगितले. धर्मा प्रोडक्शन चित्रपटासाठी नव्या चेहऱ्याच्या शोधात असताना सिद्धार्थच्या वाट्याला हा चित्रपट मिळाला. अशा प्रकारे सिद्धार्थला त्याच्या चित्रपट कारकिर्दीत पहिला ब्रेक मिळाला.
सिद्धार्थने शेरशाह, स्टूडंट ऑफ द इयर, एक व्हिलन यांसारखे हिट चित्रपट दिले आहेत.
हे ही वाचा :
- Vijay Sethupathi Birthday : सेल्समन ते अभिनेता, जाणून घ्या दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपतीचा प्रवास
- विराट कोहलीने कसोटी कर्णधारपद सोडल्यानंतर अनुष्का शर्माची इमोशनल पोस्ट
- Farhan Akhtar And Shibani Dandekar : फरहान अख्तरची गर्लफ्रेंड शिबानी दांडेकरने लग्नाआधीच काढला टॅटू
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha